शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

३ नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यता 

By सीमा महांगडे | Updated: September 17, 2022 20:24 IST

एमए मानसशास्त्र, पत्रकारिता व जनसंपर्क अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई :शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी यूजीसीने मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या एकूण २३ अभ्यासक्रमांना मान्यता दिली असून यावर्षी  एमए मानसशास्त्र, एमए संज्ञापन व पत्रकारिता व एमए जनसंपर्क या तीन अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे.  या तिन्ही अभ्यासक्रमांचे प्रवेश १८ सप्टेंबर, २०२२ ते ३० सप्टेंबर, २०२२ दरम्यान पार पडणार आहेत.

एमए मानसशास्त्र हा अत्यंत महत्वाचा अभ्यासक्रम असून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी इच्छुक असतात. सामाजिक मानसशास्त्र या विषयात एमए मानसशास्त्र सुरु होत आहे.  प्रवेश घेण्यासाठी तृतीय वर्ष बीएमध्ये किमान ३ पेपर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.  आयडॉलने यासाठी कॉम्पुटर लॅबचीही व्यवस्था केली आहे.  

याचबरोबर पत्रकारिता व जनसंपर्क ही महत्वाची क्षेत्रे असून अनेक नोकरी करणाऱ्यांना पत्रकारिता  व जनसंपर्क क्षेत्रामध्ये दूरस्थ माध्यमातून पदव्युत्तर पदवी मुंबई विद्यापीठात उपलब्ध नव्हती. यामुळे इच्छा असूनही अनेकांना हा अभ्यासक्रम नियमित माध्यमातून करता येत नव्हता. त्या सर्वांसाठी मुंबई विद्यापीठाने एमए संज्ञापन व पत्रकारिता आणि एमए जनसंपर्क हे दोन अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत.  पत्रकारिता व जनसंपर्क या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विद्याशाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणाऱ्यांना प्रवेश मिळणार आहे. 

हे तीनही अभ्यासक्रम सत्र पद्धतीनेच घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्य ऑनलाईनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे.  तसेच या अभ्यासक्रमांसाठी आयडॉलमध्ये तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत. या तीनही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी  विद्यापीठाच्या  https://mu.ac.in/distance-open-learning  या  संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.  

टॅग्स :Educationशिक्षणMumbaiमुंबई