शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा संपली, आता अकरावी प्रवेशासंदर्भात पुढच्या आठवड्यात सूचना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 06:31 IST

दहावीची परीक्षा संपली असून, आता विद्यार्थी-पालकांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. पण अकरावीच्या प्रवेशाबाबत कोणतीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती.

मुंबई :

दहावीची परीक्षा संपली असून, आता विद्यार्थी-पालकांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. पण अकरावीच्या प्रवेशाबाबत कोणतीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती. पण आता निकालाच्या आधीच्या सुटीत अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्याचा सराव विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील उपसंचालक विभागांना याबाबत सूचना देण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली आहे. 

दरवर्षी अकरावी प्रवेश प्रक्रिया कशी राबवावी? विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सराव प्रक्रिया व मूळ प्रक्रिया कधी घ्यावी, यासंदर्भातील सूचना दहावी परीक्षा संपण्याआधीच उपसंचालक कार्यालयांना दिल्या जातात. त्यानुसार उपसंचालक कार्यालयाकडून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून तयारी करून घेतली जाते. अनेक विद्यार्थी प्रवेशातील अर्धवट माहितीमुळे प्रवेशापासून दूर राहतात. त्यामुळे या सराव अर्जाची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. मात्र यंदा अद्यापही उपसंचालक कार्यालये शिक्षण संचालनालयाकडून सूचनांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून, अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला असल्याची माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.

१६ एप्रिलपासून प्रक्रियेला सुरुवातपहिल्या टप्प्यात नोंदणी आणि अर्ज भरण्याचा सराव अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात राज्यस्तरावर एक बैठक झाली आहे. त्या बैठकीनंतर प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यात जागांची नोंदणी, त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याची संधी दिली जाणार आहे. येत्या १६ एप्रिलपासून सुरुवात केली जाईल. यामुळे सुटीच्या काळात विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.

टॅग्स :ssc examदहावी