शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सरल प्रणालीत नोंदविलेल्या नववीच्या गुणांचा दहावीला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 06:39 IST

यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय १०० गुणांनुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात येईल.

मुंबई : शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार ५० टक्के अंतर्गत मूल्यांकनासाठी त्यांच्या मागील वर्षीच्या म्हणजेच नववीच्या अंतिम निकालाचा आधार घेतला जाईल. सरल प्रणालीत नोंदविलेल्या माहितीनुसार ५० टक्के गुण दिले जातील.यंदा दहावीची परीक्षा देणे अपेक्षित असलेल्या आणि शैक्षणिक वर्ष २०१९-२० ला नववीची परीक्षा दिलेल्या राज्यातील १९ लाख ३४ हजार ९४ विद्यार्थ्यांची माहिती सरळ प्रणालीत नोंद केल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. २०१९-२० ला नववीला असलेल्या या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ९४.६९ टक्के म्हणजेच १८ लाख ३१ हजार ३४४ विद्यार्थी राज्यात उत्तीर्ण होते. त्यापैकी केवळ १.२५ टक्के म्हणजेच जवळपास २४ हजार १०७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, तर ४ टक्के म्हणजे ७८ हजार विद्यार्थ्यांच्या माहितीची नोंद सरल प्रणालीत नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय १०० गुणांनुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात येईल. गेल्या म्हणजेच २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस काेरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. मात्र, त्यापूर्वी नववीच्या विद्यार्थ्यांची दोन चाचणी परीक्षा आणि सहामाही परीक्षा झाली होती. त्याआधारे नववीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून, त्याची नोंद सरल प्रणालीत आहे. सर्व राज्यातील पालघर, ठाणे आणि मुंबई पालिका विभाग वगळता इतर सर्व जिल्ह्यांतील २०१९-२० वर्षाचा नववीचा निकाल हा ९० टक्क्यांच्या वर असल्याचे दिसून आले आहे. या ३ जिल्ह्यांचा निकालही ८५ टक्क्यांहून अधिकच आहे. यंदाचा निकाल विद्यार्थ्यांना नववीच्या शैक्षणिक कामगिरीवर आधारित असाच असल्याने अनेक विद्यार्थ्यांकडून या निर्णयाचे स्वागतच होत आहे.काही महत्त्वाच्या जिल्ह्यांतील नववीच्या मूल्यमापनाची आकडेवारी (२०१९-२०)जिल्हा    विद्यार्थीसंख्या    उत्तीर्णतेचे प्रमाण (टक्क्यांमध्ये)    अनुत्तीर्णमुंबई (पालिका)    १८,४२४    ८६.०२    ६. ५९मुंबई (डीव्हायडी)    १,५६,८२९    ९३    २.८५ठाणे    १,४३,६८६    ८८. २०    ३. ०३