शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
2
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
3
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
4
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
5
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
6
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
7
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
8
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
9
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
10
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
12
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
13
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
14
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
16
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
17
विशेष लेख: आळशी मावशी ! केवळ कोंबडीमुळं बिबट्या बिघडला... इकडं धूर.. तिकडं जाळ
18
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
19
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
20
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क कपातीचा अहवाल सादर करा; शिक्षण उपसंचालकांच्या शाळांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 09:13 IST

कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेले पालक अजूनही सावरलेले नाहीत. अशातच पुण्यातील काही खासगी शाळांकडून १०० टक्के शुल्क आकारले जात आहे.

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये सरकारी निर्णयाप्रमाणे शाळांनी शालेय शुल्काच्या १४ टक्के शुल्क पालकांना परत केले आहे किंवा पुढील वर्षाच्या शुल्कात त्याचे समायोजन केल्याचा अहवाल सादर करावा अशा सूचना मुंबई उपसंचालक कार्यालयाकडून मुंबई विभागातील सर्व शाळांना दिल्या आहेत. शिक्षण विभागाकडे शुल्क कपातीवरून वाढणाऱ्या तक्रारी आणि पालक संघटनांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी शाळांनी १५ टक्के शुल्क कपात करावी, असा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप होत नसल्याचे चित्र असून, त्याबाबत पालक सातत्याने तक्रार करीत आहेत. दररोजच्या या वाढत्या तक्रारीमुळे प्राथमिक शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी मुंबई विभागातील मुंबई उत्तर, दक्षिण, पश्चिम, तसेच ठाणे, रायगड व पालघरमधील सर्व शाळांना हे परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये शाळांनी किती शुल्क कपात केली आणि कशी केली, याचा तपशील देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेले पालक अजूनही सावरलेले नाहीत. अशातच पुण्यातील काही खासगी शाळांकडून १०० टक्के शुल्क आकारले जात आहे. शिक्षण विभागाचा निर्णय आम्हाला लागू नाही असे सांगून शाळांकडून पालकांवर १०० टक्के शुल्क भरण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. त्यामुळे पालक आणि शाळा व्यवस्थापनामध्ये संघर्ष वाढत असल्याने तक्रारींचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे शुल्क कपातीची माहिती संकलित केल्यानंतर अद्याप शुल्क न घटवलेल्या शाळांवर कारवाईचा निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे प्रसाद तुळसकर व नितीन दळवी यांनी केली आहे.

शुल्क कपातीच्या आदेशानंतर मिळालेली उच्च न्यायालयाची स्थगिती ही केवळ बोटावर मोजणाऱ्या खाजगी शाळांसाठी होती. मात्र, त्याचा गैरफायदा सगळ्याच खासगी शाळांनी घेत शुल्क कपातीच्या निर्णयाला केराची टोपली दाखविली. शिक्षण विभागाकडून या निर्णयाची ठोस अंमलबजावणी व्हावी आणि पालकांना दिलासा मिळावा. - प्रसाद तुळसकर, राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघ

टॅग्स :Schoolशाळा