शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
6
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
7
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
8
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
9
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
10
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
11
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
12
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
13
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
14
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
15
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
16
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
17
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
18
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
19
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
20
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना

विद्यार्थ्यांना मिळाली गतवर्षीची प्रश्नपत्रिका; विधी अभ्यासक्रमात विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 06:54 IST

परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्याने विद्यार्थी सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयात पोहचले. परीक्षा एक तास पुढे ढकलल्याने विद्यार्थी तणावाखाली होते.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाकडून विधी अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्र विधी शाखेच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. मात्र ‘कॉन्स्टिट्यूशन लॉ’ विषयाच्या पहिल्याच पेपरला विद्यापीठाने घातलेल्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. विद्यापीठाने महाविद्यालयांना गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका पाठवल्याने परीक्षा तब्बल तासभर उशिराने सुरू करण्याची वेळ महाविद्यालयांवर आली. 

परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्याने विद्यार्थी सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयात पोहचले. मात्र परीक्षा सुरू झाल्यानंतर देण्यात आलेला पेपर हा गतवर्षीचा असल्याचे लक्षात आले. ही बाब महाविद्यालयांनी तातडीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला कळविली. त्यानंतर विद्यापीठाने परीक्षा एक तासासाठी पुढे ढकलण्याच्या सूचना महाविद्यालयांना दिल्या. परीक्षा एक तास पुढे ढकलल्याने विद्यार्थी तणावाखाली होते. काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा का पुढे ढकलली याचे उत्तरच मिळाले नसल्याने त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला.

राज्यपाल, मंत्र्यांकडे विद्यार्थ्यांसाठी नाही वेळ  विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदने दिली. परंतु महाराष्ट्रातील सद्यस्थितीत सुरू असलेल्या राजकीय नाट्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या खात्याकडे लक्ष घातल्याचे दिसत नाही.  कारण मुंबई विद्यापीठातील सर्व प्रमुख अधिकारी हे प्रभारी असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत असल्याची टीका युवासेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली आहे.  

‘जबाबदार अधिकाऱ्याची हकालपट्टी करा’  ऐन परीक्षेच्यावेळी प्रश्नपत्रिका काढून घेतल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांना परीक्षा व मूल्यमापन संचालक मंडळाने योग्य न्याय द्यावा, मात्र जबाबदार अधिकाऱ्याची हकालपट्टी करावी, अशी मागणी मनविसेचे सहसचिव संतोष धोत्रे यांनी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आले.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ