शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पालकांचा अर्धा पगार मुलांच्या शिक्षणावर खर्च; भरमसाट फी आकारूनही शाळांमध्ये शिक्षण मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 06:47 IST

कोरोनाच्या काळात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलांच्या शिक्षणाचा घसरलेला दर्जा अद्याप रुळावर आलेला नाही. 

नवी दिल्ली :

कोरोनाच्या काळात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या मुलांच्या शिक्षणाचा घसरलेला दर्जा अद्याप रुळावर आलेला नाही. 

नुकताच देशभरातील मुलांच्या वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये ६० टक्के मुलांना सरासरी १० ते ४० टक्के कमी गुण मिळाले आहेत. भरमसाठ फी आकारूनही शाळांनी मुलांचा पाया भक्कम करण्यासाठी काहीही केले नाही, ही पालकांची व्यथा आहे. पालकांना चांगल्या शाळांवर अवलंबून न राहता ट्युशनवर अधिक भर द्यावा लागला. ऑनलाइन कोचिंग व्यवसाय १७ टक्के वार्षिक दराने वाढत आहे. तो २०२७पर्यंत तब्बल १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त असू शकते.

शिक्षक झाले बेफिकीर भरमसाठ फी आकारूनही शाळा मुलांकडे लक्ष देत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शहरी शाळांमधील ४९ टक्क्यांपेक्षा जास्त मुले शिकवणी घेतात त्यामुळे शिक्षक बेफिकीर होतात. कोचिंगमुळे मुले शाळेत गांभीर्याने अभ्यास करत नाहीत.

२० ते ५०% पर्यंत ट्युशनवर खर्चप्रत्येक कुटुंब उत्पन्नाच्या सरासरी २० ते ५० टक्क्यांपर्यंत मुलांच्या शाळेची फी आणि ट्युशनवर खर्च करते. देशातील ७.५ कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी कोचिंग किंवा ट्युशन घेतात. यामध्ये ४.५ कोटी मुले आणि तीन कोटी मुली आहेत. ग्रामीण भागातील गरीब २० टक्के लोकसंख्येमध्ये १७ टक्के, तर शहरांमध्ये ३९ टक्के मुले ट्युशन घेतात.

- शैक्षणिक स्थितीचा वार्षिक अहवाल २०२२नुसार, ट्युशन घेणाऱ्या मुलांचे प्रमाण २०१८ मध्ये २६.४ टक्के वरून २०२२ मध्ये ३०.५ टक्केपर्यंत वाढले आहे. - उत्तर प्रदेश, बिहारसारख्या राज्यांमध्ये ही वाढ ८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये हा ट्रेंड कमी झाला आहे.

ट्युशन ट्रेंड कुठे जास्त? राज्य    २०१८    २०२२ प. बंगाल    ७१.८%    ७३.९%बिहार    ६१.६    ७१.७%उत्तर प्रदेश    १५.७    २३.७गुजरात    १४.८    १९.६महाराष्ट्र    ११.६    १५.८राजस्थान    ४.५    ४.६कर्नाटक    ११.२    ९.२तामिळनाडू    १४.३    ९.५

टॅग्स :Educationशिक्षण