शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मुलांसाठी ‘एज्युकेशन लोन’ घ्यावं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 05:19 IST

पालक सांगतात, मुलाला मोठ्या शहरात, अमुकच कॉलेजात, तमुकच राज्यात, ढमुकच देशात ॲडमिशन हवी आहे. फी फार आहे. पण, आपल्या परिस्थितीमुळे मुलांची संधी जाऊ नये.

- पी. व्ही. सुब्रमण्यम, आर्थिक सल्लागारॲडमिशन्सचा हंगाम सुरू झाला की पालक एक प्रश्न हमखास विचारतात, एज्युकेशन लोन घ्यावं का मुलांसाठी? हा प्रश्न एकटाच नसतो, त्यामागे मोठी भावुक मन:स्थिती असते. पालकांना वाटतं, मुलांचं उच्चशिक्षण पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी पैसा कमी पडायला नको. त्यामुळे मला कुणीही हा प्रश्न विचारला की मी उत्तर देतो, ‘इट डिपेंण्ड्स.’ पालक सांगतात, मुलाला मोठ्या शहरात, अमुकच कॉलेजात, तमुकच राज्यात, ढमुकच देशात ॲडमिशन हवी आहे. फी फार आहे. पण, आपल्या परिस्थितीमुळे मुलांची संधी जाऊ नये. त्यामुळे मी म्हणतो की, इट डिपेंण्ड्स. तुमचं वार्षिक उत्पन्न १० कोटी असेल आणि मूल  शिक्षणासाठी ५० लाख मागत असेल तर देऊन टाका, जास्त विचार करायची गरज नाही. पण, तसं नसेल तर मुलांना घेऊ द्या एज्युकेशन लोन, ते मिळावं म्हणून नक्की मदत करा. त्यांची संधी, स्वप्नं महत्त्वाचीच आहेत, पण आर्थिक गांभीर्य आणि स्वावलंबन, आर्थिक जबाबदारी घेणं शिकणं हे मुलांनीही शिकायला हवं. मुलांना एज्युकेशन लोन घेऊ देताना किंवा स्वत: तो खर्च उचलताना दोन गोष्टींचा विचार करा.१. तुमची ऐपत. तुमचं उत्पन्न किती, रिटायरमेण्टला किती दिवस राहिले, त्यानंतर निवृत्ती आर्थिक नियोजन तुम्ही काय केलं आहे, महागडा खर्च करण्याची तुमची खरंच आर्थिक तयारी आहे की कर्ज काढावं लागेल? २. तुमचं मूल खरंच ‘जबाबदार’ आहे का? वेळेत शिक्षण पूर्ण करून, जे आवडेल ते शिकून पुढे सरकण्याचं त्याचं पॅशन आहे का? की मूल खुशालचेंडू आहे?आता पहिली गोष्ट जर कर्ज काढून करायची असेल तर ते कर्ज तुम्ही कशाला घ्यायला हवं?- मुलांनाच घेऊ द्या! त्याचे काही फायदे.१. त्यांच्या शिक्षण निर्णयाचीच नाही, तर आर्थिक गोष्टींचीही मालकी त्यांच्याचकडे असेल. कर्ज लहान घेतलं तरी चालेल; पण मुलांना जबाबदारी कळली पाहिजे.२. शिक्षण संपलं की सहा महिन्यांनी कर्जफेड सुरू होते, त्यामुळे शिक्षण वेळेत संपवण्याचं बंधन आपोआप येतं. ३. पैशाचं महत्त्व समजतं, बजेटमध्येच भागवावं लागतं.४. आपली डिग्री  ‘एम्पलॉयबल’ करण्याचं बंधन येतं. कर्ज फेड आपल्यालाच करायची आहे, हे डोक्यात असतं.५. असं कर्ज घेतल्यानं काही पालकांचे-मुलांचे संबंध खराब होत नाहीत. तरुण मुलांना इंडिपेंडण्ट व्हायचं असतं, तर त्याला आर्थिक जबाबदारीची जोड हवीच.