शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

School Reopening: आजपासून शाळांमध्ये शिक्षणोत्सव; विद्यार्थ्यांच्या मनातील भीती कमी करण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 05:50 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून संपूर्ण राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. त्यानंतर ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला

ठळक मुद्देयाआधी जेथे कोरोना रुग्णसंख्या कमी होती त्या जिल्ह्यांत शाळा सुरू करण्यात आल्या होत्याशिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांप्रमाणे शनिवारी अनेक शाळांमध्ये पालक, शिक्षक यांच्यात बैठक झाली.पालक, शाळा व्यवस्थापनामध्ये अनेक मुद्द्यांवरून संभ्रम आहेत

मुंबई : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या शाळांमधील किलबिलाट सोमवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे राज्यासह मुंबईतील शाळांमध्ये उद्यापासून पुन्हा एकदा मोबाइलऐवजी प्रत्यक्ष वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे धडे घेणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना पहिल्या दिवशी शिक्षणोत्सव साजरा करावा, जेणेकरून मनावरील ताण, भीती कमी होईल अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.  

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून संपूर्ण राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. त्यानंतर ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. तेव्हापासून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी हे प्रत्यक्ष शाळांपासून दुरावले आहेत. पण  याआधी जेथे कोरोना रुग्णसंख्या कमी होती त्या जिल्ह्यांत शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र मुंबईत तब्बल दीड वर्षाहून अधिक काळानंतर शाळा विद्यार्थ्यांसाठी उघडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, तर पालकांमध्ये थोडे भीतीचे वातावरण आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांप्रमाणे शनिवारी अनेक शाळांमध्ये पालक, शिक्षक यांच्यात बैठक झाली. शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी पालक, शाळा व्यवस्थापनामध्ये अनेक मुद्द्यांवरून संभ्रम आहेत. मात्र पुढील काही काळात त्यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा दोन्ही बाजूंकडून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा