शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांत उंच ह्युमनॉइडशी रंगला गप्पांचा फड; ‘इंद्रो’ ठरला आयआयटी टेकफेस्टचा हिराे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 06:31 IST

यंदाच्या आयआयटी टेक फेस्टला शुक्रवारी मोठया दिमाखात सुरुवात झाली. आयआयटी मुंबईच्या टेक फेस्टचे यंदाचे २६ वे वर्ष आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाचे पंतप्रधान कोण, आजची तारीख काय, तुम्ही काय सेवा देऊ शकता, असे प्रश्न विचारल्यावर तुमच्या प्रश्नांना नेटकी उत्तरे देणारा आणि ९० टक्के स्वदेशी बनावटीचा इंद्रो ह्युमनॉइड आयआयटी टेकफेस्टच्या पहिल्या दिवशीचे आकर्षण ठरला. सध्या इंग्रजी भाषेत संवाद साधणार इंद्रो लवकरच मराठी आणि हिंदी भाषेतही आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊन संवाद साधू शकणार आहे. इंद्रोचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याची उंची ५.९ फूट इतकी असून देशात निर्मिती केलेला सर्वांत उंच ह्युमनॉइड म्हणून हा ओळखला जातो. संतोष हुलावळे यांनी त्याची निर्मिती केली आहे. 

यंदाच्या आयआयटी टेक फेस्टला शुक्रवारी मोठया दिमाखात सुरुवात झाली. आयआयटी मुंबईच्या टेक फेस्टचे यंदाचे २६ वे वर्ष आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आतापर्यंतची विशेष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधने इंटरनॅशनल प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. 

इंद्रोमध्ये निर्धारित माहिती भरल्यानंतर तो कोणत्याही संस्थेतील व्यक्तींना प्रशिक्षण देण्यापासून ते त्यांच्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यास कार्यक्षम आहे. एखाद्या ह्युमनॉइडमध्ये जितके जास्त जॉईंट ॲक्सेस असतात तितका तो अधिक कार्यक्षम असतो, इंद्रोमध्ये २८ कँजॉईन्ट ॲक्सेस आहेत. तो त्याच्या आधीच्या प्रकारांपेक्षा अधिक कार्यक्षम असून यामुळे तो मानवी हालचालींप्रमाणे काम करू शकत असल्याची माहिती संतोष हुलावळे यांनी दिली.    

देशभरात कार्यान्वित सेन्सर्स, कॅमेरा, कंट्रोलर यांचं साहाय्याने सूचनांप्रमाणे कार्य करण्यासाठी प्रशिक्षित असल्याने हा ह्युमनॉइड आतापर्यन्त देशातल्या विविध शाळा महाविद्यालयातही कार्यन्वित आहे.  शिक्षकांच्या सूचनांनुसार, विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्न ,शंका सोडविण्यासाठी मदत करत आहे. त्याचप्रमाणे मॉल, रेस्टॉरंट्स अशा ठिकाणी ही याची मदत होत आहे.  नाशिक, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी आतापर्यंत इंद्रो पोहोचला आहे. पुढील एका महिन्यात आर्टिफिशिअल इंटेलिजिन्सवर आधारित इंद्रोचा पुढील टप्पा लवकरच खुला करण्यात येईल, असे संतुष्ट हुलावळे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबई