शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्राथमिक तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 09:33 IST

Admission: तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), व्यवसाय अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) नंतरच्या तांत्रिक पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशाची तयारी तंत्रशिक्षण संचालनालयाने सुरू केली आहे.

मुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), व्यवसाय अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) नंतरच्या तांत्रिक पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशाची तयारी तंत्रशिक्षण संचालनालयाने सुरू केली आहे. त्यानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना माहिती भरण्याची सूचना देण्यात आली आहे. प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना त्याबाबत सविस्तर माहिती मिळावी यासाठी विद्यार्थ्यांना माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण अंतर्गत मूल्यमापन आणि निकाल कसा लावला जाईल, तसेच बारावीच्या परीक्षेबाबत कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. यामुळे अकरावीसह, आयटीआय, तंत्रशिक्षण पदविकासारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया कशी राबविली जावी याबाबत या प्राधिकरणांकडून ही कोणतीच पद्धती निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र यादरम्यान बारावी निर्णय झाल्यानंतर लगेचच प्रवेशप्रक्रियांची तयारी म्हणून तंत्रशिक्षण संचालनालयाने प्राथमिक तयारी सुरू केली आहे. दहावी-बारावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना ही माहिती भरण्यासाठी संचालनालयाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना वेळोवेळी सूचना पाठविता येतील. संचालनालयाच्या  अधिकाऱ्यांकडून प्रवेशाबाबत समुपदेशन करण्यात येईल, अशी सूचना त्यावर दिली आहे. यात विद्यार्थ्यांचे नाव, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल, जिल्हा, इच्छुक पदविका अभ्यासक्रम आणि अभिप्राय मागविण्यात आला आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रMumbaiमुंबई