शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

'आयटीआय'मध्ये मुलींचे फक्त १०% प्रवेश; २२ ते २६ ऑगस्टपर्यंत केंद्रीय समुपदेशन फेरी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 10:42 IST

आतापर्यंत राज्यभरात १४ हजार मुलींनी 'आयटीआय' साठी प्रवेश घेतल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील 'आयटीआय'त यंदा मुलांच्या ५१ टक्के प्रवेशाच्या तुलनेत मुलींचे प्रवेशाचे प्रमाण १० टक्के इतके कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. आतापर्यंत राज्यभरात १४ हजार मुलींनी 'आयटीआय' साठी प्रवेश घेतल्याची माहिती व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने दिली.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या माहितीनुसार, राज्यात २१ ऑगस्टपर्यंत आयटीआयच्या सर्व ट्रेडसाठी एकूण १,५०,०५२ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी आतापर्यत ९१,०६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये मुलांचे प्रवेश ७६,१२२ तर मुलींचे अवघे १४,९३८ इतके झाले आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींच्या प्रवेशाचे प्रमाण फक्त १० टक्के असून, मुलांचे ५१ टक्के प्रवेश झाले आहे. यात मेकॅनिक विषयाकडे सर्वात कमी कल असून फक्त २,२४२ प्रवेश झाले आहेत. त्यानंतर टर्नर २,३५३, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक २,८६१ इतके प्रवेश झाले आहेत. तर वायरमनसाठी ४,८६७, मेकॅनिक मोटर व्हेईकल ४,९०३, मेकॅनिक डिझेल ५,१९१ व कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंगसाठी ६,००० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

वेल्डरसाठी ९,१८८, फिटरकरिता १०,२८० तर इलेक्ट्रिशनसाठी सर्वाधिक १७,६२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. सरकारी आयटीआयमध्ये एकूण ६९,७०७ प्रवेश, खासगी आयटीआयत त्या तुलनेत कमी म्हणजे २१,३५३ प्रवेश झालेले आहेत. पहिल्या कॅप फेरीत ४२,००० तर पाचव्या कॅप फेरीमध्ये फक्त एक हजारच प्रवेश झाले आहेत.

समुपदेशन फेरी

२२ ते २६ ऑगस्टपर्यंत आयटीआय प्रवेशासाठी केंद्रीय समुपदेशन फेरी सुरू राहणार आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे.

आयटीआय प्रवेशात मुलींची संख्या वाढावी, यासाठी समुपदेशन करणे आवश्यक आहेत. तसेच त्यांच्या प्रवासाची व्यवस्था देखील करायला हवी.- जयवंत कुलकर्णी, समुपदेशक

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजStudentविद्यार्थीMumbaiमुंबई