शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी दीड लाख अर्ज; १३ ऑगस्टला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 07:19 IST

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी करण्यात येणाऱ्या अर्ज नोंदणीची मुदत संपल्याने त्यात आणखी एका आठवड्याची वाढ करण्यात येणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत पॉलिटेक्निक पदवी प्रवेशाची अर्ज प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत यासाठी १ लाख ५५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.  त्यातील सव्वा लाख विद्यार्थ्यांनी संपूर्ण शुल्क भरून अर्जाची निश्चितीही केली आहे. दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी अलॉटमेंटचे पुढील वेळापत्रक जाहीर होणार आहे. 

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  राज्यातील ३६४ पॉलिटेक्निक महाविद्यालयांची प्रवेश क्षमता १,०१,२२४ असून त्यासाठी आतापर्यंत १ लाख ५५  हजार अर्ज नोंदणी झाली आहे. 

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी करण्यात येणाऱ्या अर्ज नोंदणीची मुदत संपल्याने त्यात आणखी एका आठवड्याची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येत्या ११ ऑगस्टपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या अर्जनोंदणीत निश्चित आणखी काही हजारांची भर पडणार असल्याचा विश्वास संचालनालयाकडून व्यक्त होत आहे.  

पॉलिटेक्निककडे कल का?विद्यार्थ्यांचा पदविका अभ्यासक्रमांकडे वाढणार कल, औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार पॉलिटेक्निक अभ्यासक्रमामध्ये करण्यात येणारे बदल, शिक्षकांचे वेळोवेळी होणारे प्रशिक्षण, शिवाय उद्योग व्यावसायिक संस्था आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित संस्थांशी आवश्यक करार व संवाद यामुळे पॉलिटेक्निक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची अर्जनोंदणी आणि प्रत्यक्ष प्रवेश वाढत आहेत.