शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

आता विद्यार्थी राहणार नाही ‘बॅकबेंचर’;  केरळच्या शाळेत नवी बसण्याची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 08:21 IST

केरळमधील शाळांनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नवीन व्यवस्था केली असून, यात आता कोणताही विद्यार्थी ‘बॅकबेंचर’ राहणार नाही.

कोल्लम :  शाळा म्हटले की मजा, मस्ती आणि मित्र-मैत्रिणीसोबत आवडत्या बेंचवर बसण्याची धडपड आलीच. कोणत्या बेंचवर बसायचं हे आधीच ठरलेलं असते. हुशार मुलं विशेषत: शिक्षकांच्या समोर पुढच्या बेंचवर बसतात आणि बॅकबेंचर मुले म्हणजे मठ्ठ, ढ अशी विशेषणे लागतात. ज्या मुलांना मस्ती करायची असते, शिक्षणात फारसा रस नसतो ती मुले मागे बसतात असे म्हटले जाते. पण  या विचारसरणीला छेद देणारी एक हटके कल्पना समोर आली आहे. केरळमधील शाळांनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नवीन व्यवस्था केली असून, यात आता कोणताही विद्यार्थी ‘बॅकबेंचर’ राहणार नाही.

नवीन उपक्रमाचे मॉडेल : कोल्लम जिल्ह्यातील वालकोम येथील आरव्हीएचएसएस हे त्यांच्या वर्ग बसण्याच्या व्यवस्थेसह नवोपक्रमाचे एक मॉडेल म्हणून समोर आले आहे. वर्गात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे समान लक्ष देता यावे यासाठी बसण्याची व्यवस्था बदलण्यात आली असून, यात कोणीही ‘बॅकबेंचर’ नाही.

चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणाले... : ‘स्थानार्थी श्रीकुट्टन’ चित्रपटाचे दिग्दर्शक विनेश विश्वनाथन यांनी सांगितले की, पंजाबमधील एका शाळेनेही ही कल्पना स्वीकारली आहे. मला आनंद आहे की याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली.

चित्रपटापासून प्रेरणाशाळांनी स्थानार्थी श्रीकुट्टन या चित्रपटापासून प्रेरित होऊन विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये शाळेतील मुले बॅकबेंचर नसतील अशी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.यात प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत सहज पोहोचता येते, सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांकडे सहज पाहता येते आणि विद्यार्थीदेखील त्यांच्या शिक्षकांना सहजपणे पाहू शकतात. केरळमधील आठ शाळांनी आधीच ही बसण्याची व्यवस्था स्वीकारली आहे आणि पंजाबमधील एका शाळेतही ती लागू केली आहे.

टॅग्स :Schoolशाळा