शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

समान गुण असले तरी प्रवेशाचे ‘नो टेन्शन’; अकरावीसाठी काही निकषांत बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 05:31 IST

मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ...

मुंबई :यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार यंदा एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या समान गुणांच्या आधारे प्रवेश देताना जन्मदिनांकापासून ज्येष्ठ विद्यार्थी अगोदर याप्रमाणे क्रम आणि जन्मदिनांक समान असल्यास विद्यार्थ्याचे पूर्ण नाव (म्हणजे नाव, वडिलांचे नाव, आडनाव) इंग्रजी घेऊन त्या वर्णाक्षरांच्या क्रमानुसार क्रम ठरविण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे गुण समान असले तरी विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी अडचण येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी अकरावी प्रवेशाची व्याप्ती वाढविण्यात आली असून, वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणांप्रमाणे यंदा या प्रवेशाच्या कार्यपद्धतीत शासनाने बदल केले आहेत. अकरावी प्रवेशातील सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाकरिता (एसईबीसी) सामान्य प्रशासन विभागाच्या ५ जुलै, २०२१ च्या निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. याशिवाय  इनहाऊस कोट्यांतर्गत प्रवेश कोणत्याही टप्प्यावर करण्याची व प्रत्यार्पित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सहसचिव इ. मु. काझी यांनी दिल्या आहेत.

२८ मार्च २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांतील मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील वसई व भिवंडी तालुका व पनवेल (ग्रामीण) हा भाग तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मोशी, चऱ्होली, चिखली, दिघी, डुडूळगाव या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय / कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नव्हते. मात्र यंदा या गावांचाही प्रवेश प्रक्रियेत समावेश करावा, अशा सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. तसेच शिक्षण संचालनालयाने आवश्यक ती कार्यवाही करून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.आता एका फेरीसाठी प्रतिबंधितप्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी आणि महाविद्यालयाने प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित करण्यात येऊन चौथ्या विशेष फेरीत संधी देण्यात येत असे. मात्र या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. नवीन निकषांप्रनुसार या विद्यार्थ्यांना पुढच्या केवळ एका फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येऊन त्यानंतरच्या फेरीसाठी संधी द्यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालEducationशिक्षण