शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 06:08 IST

दी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सने (एनबीए) याबाबत माहिती देताना आता परीक्षा दोन वेगळ्या भागात विभाजित करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जून महिन्यात होणाऱ्या नीट-पीजी या सामाईक प्रवेश परीक्षेच्या रचनेत बदल केला आहे. परीक्षेला काही दिवस शिल्लक असताना हा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

दी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सने (एनबीए) याबाबत माहिती देताना आता परीक्षा दोन वेगळ्या भागात विभाजित करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. प्रत्येक विभागाकरिता स्वतंत्र वेळ दिला जाईल. आधी नीट-पीजीचे २०० प्रश्न सोडविण्याकरिता एकत्रितपणे १८० मिनिटे दिली जात होती. 

आता  प्रत्येक विभागातील प्रश्नांची संख्या आणि स्वरूपानुसार वेळ ठरवून दिली जाणार आहे. हे बदल २०२४ पासून होणाऱ्या नीट-पीजीपासूनच लागू केले जाणार आहेत. ही परीक्षा संगणकाधारित असेल. परीक्षेत गैरप्रकार होऊ नये म्हणून हे बदल करण्यात आल्याची माहिती एनबीएने दिली.

होणार काय?पहिल्या विभागाकरिता दिला गेलेला कालावधी संपेपर्यंत विद्यार्थ्यांना दुसरा विभाग सोडविता येणार नाही. पुढील विभागाची वेळ सुरू झाल्यानंतर मागील विभागातील प्रश्न सोडविता वा दुरुस्त करता येणार नाहीत; परंतु दिलेली वेळ संपेपर्यंत सोडविलेल्या प्रश्नाचे पुनरावलोकन करता येईल.

किमान मॉक टेस्ट तरी घ्यावीजून महिन्यात नीट-पीजीचे आयोजन केले आहे. एनबीएने किमान विद्यार्थ्यांना मॉक टेस्टची सोय उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून परीक्षेच्या रचनेबाबत स्पष्टता येईल, अशी मागणी पालकांनी केली.

यामध्ये झाले बदलनीट-पीजी, नीट-एमडीएस, नीट-एसएस, एफएमजीई, डीएनबी-पीडीसीईटी, जीपॅट, डीपीईई, एफडीएसटी, एफईटी, एनबीईएमएस.

टॅग्स :examपरीक्षा