शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीबीए, बीएमएस, बीसीएची नावे बदलणार; एआयसीटीईच्या नियमांना बगल देण्यासाठी पर्यायाची चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 10:33 IST

एआयसीटीईचे कठोर निकष लागू नये म्हणून त्यांचे नामकरण करण्याचा पर्याय पुढे आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बीबीए, बीएमएस आणि बीसीए अभ्यासक्रमांच्या नाव बदलाला विद्यापीठाच्या विद्वत सभेत (अकॅडेमिक कौन्सिल) मान्यता घेऊन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) निकषांना बगल देण्याचा विचार सुरू आहे.

एआयसीटीईचे कठोर निकष लागू नये म्हणून त्यांचे नामकरण करण्याचा पर्याय पुढे आला होता. या संदर्भात मुंबईतील महाविद्यालय प्राचार्यांनी नुकतीच उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात विद्यापीठांच्या विद्वत सभेत या संदर्भातील प्रस्ताव मंजूर करून घ्यावा, असा विचार पुढे आला. एआयसीटीईचे नियम या अभ्यासक्रमांना लागू केल्यास महाविद्यालयांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. आम्ही याबाबत मुंबई विद्यापीठाला पत्र लिहिले होते. तसेच, राज्य सरकारकडेही आपल्या अडचणी मांडल्या होत्या, अशी माहिती मुंबई महाविद्यालय प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष टी. ए. शिवारे यांनी सांगितले. विद्यापीठात १५५ महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम राबविला जात आहे. गेल्या वर्षी १४ हजार विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता. 

स्वायत्त महाविद्यालयांच्या धर्तीवर नामबदल स्वायत्त महाविद्यालये नाव बदलून हे अभ्यासक्रम राबवित आहेत. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतूनही याच पद्धतीने नाव बदलून हे अभ्यासक्रम राबविले जातील, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

 असा होणार नामबदल मूळ अभ्यासक्रम    प्रस्तावित नावबॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस)     बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज) बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए)     बीकॉम (बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन)बॅचलर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए)     बीएस्सी (कॉम्प्युटर ॲप्लिकेशन)

हे अभ्यासक्रम शहराप्रमाणे राज्याच्या ग्रामीण भागातही लोकप्रिय आहेत. परंतु, त्यांना एआयसीटीई अंतर्गत आल्यास ते लवकरच बंद होतील. कारण अभ्यासक्रम राबविण्यासाठीचा खर्च वाढेल आणि विद्यार्थ्यांना हे शुल्क परवडणार नाही.- टी. ए. शिवारे

टॅग्स :Educationशिक्षण