शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

MPSC परीक्षा वेळापत्रक 2022 (सुधारित) जारी, 'येथे' पाहा परीक्षेच्या तारखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 19:07 IST

MPSC Exam Calendar 2022 : एमपीएससीच्या विविध विभागांमध्ये उमेदवारांची भरती करण्यासाठी आयोग प्रवेश परीक्षा घेईल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अलीकडेच त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर MPSC 2022 चे तात्पुरते वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. इच्छुक उमेदवारांना MPSC 2022 परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी MPSC पात्रता निकष आणि अर्जाच्या तारखा तपासण्याचा सल्ला दिला जातो. एमपीएससीच्या विविध विभागांमध्ये उमेदवारांची भरती करण्यासाठी आयोग प्रवेश परीक्षा घेईल.

MPSC पात्रता निकष 2022

MPSC पात्रता निकष 2022 नुसार, MPSC 2022 परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांची वयोमर्यादा 19 ते 38 वर्षे आहे. आयोग राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत काही सवलत देतं. MPSC 2022 च्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र होण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेत प्रावीण्य असंणं आवश्यक आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी अनुमती असलेल्या प्रयत्नांची संख्या 6 आहे तर OBC उमेदवार MPSC परीक्षेत एकूण 9 वेळा प्रयत्न करू शकतात. SC/ST प्रवर्गातील उमेदवार अमर्यादित वेळा प्रयत्न करू शकतात.

MPSC 2022 परीक्षेच्या तारखा

MPSC परीक्षा वेळापत्रक 2022 मध्ये MPSC राज्यसेवा 2022 परीक्षा, MPSC एकत्रित परीक्षा 2021 आणि 2022 सोबत इतर परीक्षांच्या तारखा समाविष्ट आहेत. एमपीएससी परीक्षेच्या काही महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत

> MPSC 16 एप्रिल 2022 रोजी उपनिरीक्षक मर्यादित विभागीय 2022 स्पर्धा पूर्व परीक्षा आयोजित करेल.> MPSC राज्यसेवा 2021 मुख्य परीक्षा 7, 8,9 मे 2022 रोजी होणार आहे.> MPSC राज्यसेवा 2022 ची प्रिलिम्स परीक्षा 19 जून 2022 रोजी होणार आहे आणि मुख्य परीक्षा 15, 16, 17 ऑक्टोबर 2022 रोजी होणे अपेक्षित आहे.> MPSC एकत्रित परीक्षा 2022 अधिसूचना जून 2022 मध्ये निघणे अपेक्षित आहे आणि आयोगाने 8 ऑक्टोबर 2022 रोजी MPSC एकत्रित पूर्व परीक्षा 2022 आयोजित करणे अपेक्षित आहे.> MPSC एकत्रित मुख्य पेपर 1 2021 ची परीक्षा 09 जुलै 2022 रोजी होणार आहे.> MPSC एकत्रित मुख्य पेपर 2 पोलीस उपनिरीक्षक 2021 परीक्षा 17 जुलै 2022 रोजी होणार आहे.> MPSC राज्य कर निरीक्षक मुख्य पेपर 2 2021 आयोगाद्वारे 24 जुलै 2022 रोजी घेण्यात येईल. त्याची अधिसूचना 28 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली.> MPSC एकत्रित मुख्य परीक्षा 2021 चा पेपर 2 सहाय्यक विभाग अधिकाऱ्यासाठी 31 जुलै 2022 रोजी होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग थेट सेवा भरतीद्वारे तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कृषी सेवक, शिपाई, पोलीस भरती, आरोग्य भरती, म्हाडा भरती इत्यादी विविध विभागांमधील 30 हून अधिक पदं भरतं. MPSC वर नमूद केलेल्या पदांसाठी वर्षभर वेगवेगळ्या जाहिराती प्रसिद्ध करते आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच भरती करते. महाराष्ट्र तलाठी भारती 2022 ची लेखी परीक्षा फेब्रुवारी 2022 मध्ये घेणं अपेक्षित आहे.  

MPSC 2022 परीक्षेचं तात्पुरतं वेळापत्रक

MPSC परीक्षाअधिसूचना जारी करण्याची तारीखप्रिलिम्स परीक्षेची तारीखमुख्य परीक्षेची तारीख
MPSC Rajyaseva 2021 ExamOctober 04, 2021January 23, 2022May 07, 08, 09, 2022
MPSC Rajyaseva 2022 ExamApril 2022June 19, 2022October 15, 16, 17, 2022
MPSC Combined Exam 2021November 28m 2021February 26, 2022Not Released Yet
MPSC Combined Exam 2022June 2022October 08, 2022Not Released Yet
Police Sub Inspector Departmental Competitive Exam 2022February 11, 2022April 16, 2022Not Released Yet
Civil Judge Junior Division & Judicial Magistrate First Class Exam 2022March 2022August 07, 2022November 02, 2022 
Assistant Motor Vehicle Inspector Exam 2022June 2022December 10, 2022April 30, 2023
MPSC Group-C Exam 2021December 21, 2021November 05, 2022-
Maharashtra Technical Service Combined Pre-Examination 2022July 2022November 26, 2022-

MPSC 2022 परीक्षेला बसण्याचा विचार असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख तपासली पाहिजे आणि गर्दी टाळण्यासाठी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरला पाहिजे. इच्छुकांनी MPSC 2022 परीक्षेची तयारी योग्य संसाधनांसह सुरू केली पाहिजे. सराव पेपर, मॉक टेस्ट, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, उपयुक्त MPSC पुस्तकांची यादी, अभ्यास साहित्य आणि बरेच काही यासारख्या सर्व तयारी संसाधनांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवार Prepp.in चा संदर्भ घेऊ शकतात. इच्छुक उमेदवारांना मागील वर्षांचे पेपर सोडविण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि त्यांची तयारी पूर्ण करण्यासाठी मॉक टेस्ट द्या. MPSC 2022 परीक्षेशी संबंधित नवनवीन अपडेट्स आणि माहितीसाठी इच्छुक Prepp चा संदर्भ घेऊ शकतात.