शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तुमच्या सवडीनुसार जे हवे ते शिका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 08:19 IST

Education : आता ऑनलाइन शिक्षण शब्द उच्चारल्यावर घरात मोबाइलच्या स्क्रीनद्वारे शाळा शिकणारी मुले, हेच चित्र डोळ्यापुढे आले असेल; पण तसे नाही तर, तुम्ही कोणत्याही व्यवसायात असा, कोणत्याही वयाचे असा.

नोकरी-धंद्यातील रोजच्या धावपळीत अनेक वेळा इच्छा असूनही आवडत्या गोष्टी शिकायच्या राहून जातात. ही परिस्थिती अगदी गेल्या दोन-तीन वर्षांपर्यंत होती; पण कोव्हिड काळात तंत्रज्ञानाचे नवीन आविष्कार जन्माला आले. त्यातीलच एक महत्त्वाचा आविष्कार म्हणजे ऑनलाइन शिक्षण. आता ऑनलाइन शिक्षण शब्द उच्चारल्यावर घरात मोबाइलच्या स्क्रीनद्वारे शाळा शिकणारी मुले, हेच चित्र डोळ्यापुढे आले असेल; पण तसे नाही तर, तुम्ही कोणत्याही व्यवसायात असा, कोणत्याही वयाचे असा. तुमच्या आवडीचे विषय आता तुम्हाला ऑनलाइन शिकता येतील. 

ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय?- याचे सोपे उत्तर म्हणजे, मोबाइल अथवा कॉम्प्युटरवरून इंटरनेटच्या माध्यमातून विशिष्ट लिंक अथवा वेबसाईटच्या माध्यमातून मिळणारे शिक्षण. लॉकडाऊनच्या काळात शैक्षणिक संस्थांनी झूम, गुगल मीट आदींद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. मात्र, या पलीकडे जात मुंबई, दिल्लीतील काही तरुणांनी एकत्र येत ऑनलाइन शिक्षणासाठी काही अभिनव वेबसाईटची निर्मिती केली आणि या वेबसाईटद्वारे हजारो प्रकारच्या कोर्सेसचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. 

यामध्ये काय शिकायला मिळते?- युडेमी, कोर्सेरा या ऑनलाइन शिक्षणामधील अग्रगण्य वेबसाईट म्हणून लोकप्रिय आहेत. या वेबसाईटवर आजच्या घडीला अक्षरशः शेकडो विषयांचे हजारो कोर्सेस उपलब्ध आहेत. उदाहरण सांगायचे तर, फोटोग्राफी हा साधा विषय घेतला तरी, डिजिटल फोटोग्राफी, मोबाइल फोटोग्राफी, स्टील फोटोग्राफी, प्रॉडक्ट फोटोग्राफी असे त्यात किमान १० प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत.  

याची रचना कशी असते?- विषयानुसार यामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.- ज्या विषयाचे प्रशिक्षण घ्यायचे आहे, त्याचे व्हिडिओ, ॲनिमेशनद्वारे सादरीकरण केले जाते.- या वेबसाईटमधील अनेक कोर्सेसच्या प्रशिक्षणाचे व्हिडिओ हे संबंधित विषयांतील तज्ज्ञांकडून तयार करून घेण्यात आले आहेत.- थेट तज्ज्ञांकडून आपल्या आवडीचा विषय शिकता येतो. - प्रत्येक कोर्स हा किमान दीड तास ते कमाल पाच तासांपर्यंत आहे.- एकाच वेळी कोर्स पूर्ण करण्याची सक्ती नाही. त्यामुळे आपल्या सोयीनुसार प्रत्येक मॉड्यूल शिकता येते.- या कोर्सेसचे शुल्कदेखील माफक आहे.

टॅग्स :Educationशिक्षण