शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जेईई, नीट परीक्षा वेळेवर न घेतल्यास शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता; विद्यार्थी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 06:48 IST

केंद्रीय उच्चशिक्षण सचिव अमित खरे यांचे मत

नवी दिल्ली : जेईई (मेन) व नीट या परीक्षा दिवाळीनंतरच्या कालावधीपर्यंत पुढे ढकलायचा निर्णय घेतला तर संपूर्ण शैक्षणिक वर्षच वाया जाईल व त्याचा परिणाम येत्या काही वर्षांच्या प्रवेशप्रक्रियेवर होईल. त्यामुळे या दोन्ही परीक्षा यंदा वेळेवर घेणे आवश्यक आहे, असे केंद्रीय उच्चशिक्षण सचिव अमित खरे यांनी सांगितले.

अमित खरे म्हणाले की, जेईई (मेन) व नीट या दोन परीक्षा यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये होणार होत्या. कोरोनाच्या साथीमुळे त्या परीक्षा जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. मात्र, या परीक्षा आणखी पुढे ढकलण्याची विनंती अनेक विद्यार्थ्यांनी केल्यामुळे त्या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचे केंद्र सरकारने ठरविले. आता या परीक्षा दिवाळीनंतरच घ्या, असे काही विद्यार्थी म्हणत आहेत.

त्यांनी सांगितले की, दिवाळीनंतर उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी छटचा उत्सव २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल. समजा त्याच्या एक आठवड्यानंतर जेईई (मेन) व नीट या परीक्षा घ्यायचे ठरविले तर त्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घ्याव्या लागतील व त्याचे निकाल पुढील वर्षी जाहीर होतील. म्हणजे एक पूर्ण शैक्षणिक वर्षच वाया जाण्याचा धोका आहे.ममता यांची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी कोरोनामुळे जेईई (मेन) व नीट परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरियाल यांच्याकडे केली होती. कोरोना काळामध्ये परीक्षा घेण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर यांनी केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.2021 वर्षातील प्रवेशप्रक्रियेला उशीर झाला तर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी पूर्वी होत्या तितक्याच जागा राहणार आहेत. त्यांची संख्या दुप्पट होणार नाही याची सर्वांनी नोंद घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच यंदाचे शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे थोडे उशिरा का होईना; पण नोव्हेंबरमध्ये सुरू करायचे आहे. यंदाची शैक्षणिक सत्रे कमी कालावधीची व कमी सुट्यांची राहतील; पण आॅगस्ट २०२१ मध्ये पुढील बॅच दाखल व्हावी, असे उद्दिष्ट आम्ही राखले आहे. सर्वांच्या भवितव्याचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचे केंद्रीय उच्चशिक्षण सचिव अमित खरे यांनी सांगितले.

टॅग्स :examपरीक्षा