नवी दिल्ली : एनआयआरएफने (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) देशातील शिक्षण संस्थांची क्रमवारी जाहीर केली असून आयआयटी मद्रासने सलग सातव्या वर्षी यात अव्वल स्थान पटकावले आहे. विद्यापीठांच्या क्रमवारीत आयआयएससी बंगळुरू पहिल्या स्थानावर आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही क्रमवारी जाहीर केली. त्यानुसार, आयआयटी बॉम्बे आणि आयआयटी दिल्लीने आपले स्थान यंदाही टिकवले आहे. विद्यापीठांमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दुसऱ्या स्थानी आहे. मणिपाल विद्यापीठ तिसऱ्या स्थानी आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या स्थानी राहिलेले जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ यंदा चौथ्या स्थानावर आहे. महाविद्यालयांच्या क्रमवारीत दिल्ली विद्यापीठाचे हिंदू कॉलेज आणि मिरांडा हाऊसने पहिले व दुसरे स्थान कायम राखले. मुक्त विद्यापीठांमध्ये इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ (इग्नू) पहिल्या स्थानी आहे.
इतर श्रेणींतील अव्वल संस्थाव्यवस्थापन : आयआयएमअहमदाबाद, गुजरातफार्मसी : जामिया हमदर्द, दिल्लीलॉ स्कूल्स : नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया विद्यापीठ, कर्नाटकदंतवैद्यकीय : एम्स, दिल्लीवैद्यकीय : एम्स, दिल्लीकौशल्य : सिम्बॉयसिस, पुणेअभियांत्रिकी : आयआयटी मद्रास, तामिळनाडूसंशोधन संस्था : आयआयएस, कर्नाटकमहाविद्यालये : हिंदू कॉलेज, दिल्लीविद्यापीठे : आयआयएस, कर्नाटक
पहिल्या दहामध्ये ९ आयआयटीअभियांत्रिकीत पहिल्या दहा संस्थांत ९ आयआयटींचा समावेश आहे. या श्रेणीत आयआयटी मद्रास अव्वल असून दिल्ली व बॉम्बेने दुसरे व तिसरे स्थान पटकावले आहे. पहिल्या दहांत आयआयटी व्यतिरिक्त नवव्या स्थानावर एनआयटी तिरुचिरापल्लीने स्थान मिळवले.
एकूण १७ श्रेणी : एनआयआरएफने २०२५ साठी एकूण १७ श्रेणीत ही क्रमवारी जाहीर केली. या सर्व श्रेणीत आयआयटी मद्रास अव्वल ठरले.
मुंबई विद्यापीठ देशात ५४व्या स्थानी नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाने ६१व्या स्थानावरून ५४व्या स्थानी झेप घेतली आहे.
हे असतात निकषशिक्षणाचा दर्जा, संशोधन, नवोन्मेष, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, त्यांच्या कुटुंबीयांना केले जाणारे सहकार्य आणि संबंधित संस्थांचे निर्णय अशा निकषाआधारे ही क्रमवारी जाहीर केली जाते.