शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या काळाची गरज ओळखून ‘लॉजिस्टिक’साठी IIM ने तयार केले सात नवे अभ्यासक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 10:56 IST

मान्यता मिळताच स्वयंम प्लॅटफॉर्मवर शिकता येणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशात लॉजिस्टिक क्षेत्रात येत्या पाच वर्षांत नव्याने एक ते दीड कोटी नोकऱ्या निर्माण होणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने आयआयएम-मुंबईने स्वयंम प्लॅटफॉर्मसाठी नव्याने सात अभ्यासक्रमांचा आराखडा तयार केला आहे. त्यांना मान्यता मिळताच, तो देशभरातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंम प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्याचा आयआयएमचा मानस आहे.

मुंबईत नव्याने सुरू झालेल्या आयआयएम - मुंबईने बदलत्या काळाची गरज ओळखून अभिनव अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून संस्थेने ‘डिजिटल सप्लाय चेन’ हा अभ्यासक्रम स्वयंम प्लॅटफॉर्मसाठी यापूर्वीच तयार करून लागू केला आहे. आता संस्थेने नव्याने सात अभ्यासक्रम आराखडे तयार करून ते केंद्रीय उच्चशिक्षण मंत्रालयाकडे पाठविले आहेत.

नवे अभ्यासक्रम nवेअरहाउस ऑटोमेशनnएआय/एमएल इन पोर्ट मॅनेजमेंटnसप्लाय चेन डिजिटायझेशनnरोल ऑफ ब्लॉक चेन अँड सप्लाय ट्रान्सफॉर्मेशन nई- कॉमर्स सप्लाय चेनnसायबर सिक्युरिटी इन सप्लाय चेनnडिजिटल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी इन सप्लाय चेन मॅनेजमेंट

‘गती शक्ती’अंतर्गत ३५ ठिकाणी लॉजिस्टिक पार्क

केंद्राच्या गती शक्ती प्रकल्पांतर्गत देशात ३५ ठिकाणी लॉजिस्टिक पार्क उभारले जाणार आहेत. म्हणूनच आयआयएम - मुंबईने हेल्थकेअर लॉजिस्टिक, पोर्ट मॅनेजमेंट, एअरकार्गो मॅनेजमेंट आदी १४ अभ्यासक्रम सुरू केले आहेत, तसेच काही विषयांचा अभ्यासक्रम आराखडा तयार करून तो अन्य संस्थांना दिला आहे.

आयआयएम - मुंबईचे काही अभ्यासक्रम १५ तासांचे, तर काही अभ्यासक्रम ३० तासांचे आहेत. नामांकित कंपन्यांही हे अभ्यासक्रम राबवित आहेत, तसेच कंपन्यांतील कर्मचारीही त्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असल्याचेही तिवारी यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणMumbaiमुंबई