शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आयडॉलच्या जानेवारी सत्राचे प्रवेश सुरू; २२ मार्चपर्यंत प्रवेशप्रक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 09:33 IST

जानेवारी सत्रामध्ये विद्यार्थी बीए, बीकॉम, बीकॉम अकाऊंटिंग अँड फायनान्स, एमए, एमकॉम, एमए शिक्षणशास्त्र व एमए भूगोल या सात अभ्यासक्रमांमध्ये हे प्रवेश विद्यार्थी घेऊ शकणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) जानेवारी सत्राच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशास ८ मार्चपासून सुरुवात झाली असून, ही प्रवेशप्रक्रिया २२ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांना जानेवारी ते डिसेंबर २०२२ च्या सत्रात प्रवेश घेऊन दूरस्थ माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण करता येईल. 

या जानेवारी सत्रामध्ये विद्यार्थी बीए, बीकॉम, बीकॉम अकाऊंटिंग अँड फायनान्स, एमए, एमकॉम, एमए शिक्षणशास्त्र व एमए भूगोल या सात अभ्यासक्रमांमध्ये हे प्रवेश विद्यार्थी घेऊ शकणार आहेत. बारावी उत्तीर्ण झालेल्या पण जुलै सत्रात प्रवेश घेऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी यात प्रवेश घ्यावा, असे आवाहन संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.

जानेवारी २०२६ पर्यंत मान्यतावर्ष २०२० मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने जुलै सत्रासह जानेवारी सत्रातही प्रवेश देण्याची अनुमती दिली. यानुसार वर्ष २०२२ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेलाही जानेवारी सत्राचे प्रवेश करण्यास मान्यता मिळाली. मुंबई विद्यापीठाला नॅकची ए++ग्रेड व ३.६५ गुण मिळाल्याने यूजीसीने आयडॉलला जानेवारी २०२६ पर्यंत मान्यता दिली. 

सेमिस्टर पद्धतीमध्ये प्रवेशn आयडॉलमध्ये जुलै सत्रामध्ये सत्र पद्धतीस प्रारंभ झाला आहे.  या जानेवारी सत्रामध्ये पदवीच्या प्रथम व व्दितीय वर्ष बीए, बीकॉम व बीकॉम अकाऊंटिंग अँड फायनान्सबरोबरच पदव्युत्तर प्रथम व द्वितीय वर्ष एमए व एमकॉममध्येही सेमिस्टर पद्धत सुरू करण्यात आली आहे. n एमएमध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी हे भाषा विषय असून, मानव्य व सामाजिकशास्त्रामध्ये इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, व समाजशास्त्र या विषयांसाठी प्रवेश घेता येईल. तसेच एमए शिक्षणशास्त्र व एमए भूगोल हे अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. n एमकॉममध्येही अकाऊंट्स व व्यवस्थापन असे दोन समूह विषय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. हे सर्व प्रवेश ऑनलाइन आहेत.