शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

IAS Success Story:'भाऊ आर्मीत गेला अन् उरी हल्ला झाला; त्याच क्षणी ठरवलं' वाचा IAS दिव्या मिश्राची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 14:12 IST

IAS Success Story: IAS दिव्या मिश्राने UPSC सारखी कठीण परीक्षा मेहनतीने आणि समर्पणाने उत्तीर्ण केली.

IAS Success Story: दरवर्षी लाखो विद्यार्थी नागरी सेवा परीक्षा (UPSC Exam) देतात, परंतु केवळ काहीशे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतात. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका विद्यार्थ्‍याबद्दल सांगणार आहोत, जिने ही कठीण परीक्षा तिच्या मेहनतीने आणि समर्पणाने उत्तीर्ण केली. भारतीय लष्करावर (Indian Army) उरीमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे (Uri Attack) तिला IAS होण्याची प्रेरणा मिळाली.

आम्ही IAS दिव्या मिश्रा हिच्याविषयी (Divya Mishra) बोलत आहोत. तिने आपला भाऊ सैन्यात भरती झाल्याचे पाहून नागरी सेवा परीक्षा देऊन देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. तिला लहानपणापासूनच UPSC परीक्षेविषयी आकर्षण होते, पण काही वर्षांपूर्वी झालेल्या उरी दहशतवादी हल्ल्याने तिचा निश्चय अधिक पक्का झाला.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत IAS दिव्या सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करण्याच्या प्रश्नावर म्हणाली- माझ्या भावाची भारतीय सैन्यात निवड झाली होती. तो सध्या लेफ्टनंट पदावर आहेत. माझ्या कुटुंबातील कोणीही संरक्षण दलात गेले नाही. अशा परिस्थितीत भाऊ गेल्यानंतर एक वेगळाच अनुभव आला. यातच उरी हल्ला झाला. यामुळे माझ्यात एक वेगळीच भावना निर्माण झाली आणि मला नागरी सेवेत रुजू होण्यास प्रवृत्त केले. मलाही माझ्या पद्धतीने देशाची सेवा करायची होती.

कोण आहे दिव्या मिश्रा?दिव्या मिश्रा मूळची उत्तर प्रदेशातील कानपूरची आहे. तिचे आई-वडील शिक्षक आहेत. घरात शिक्षणाचे वातावरण आहे. दिव्याने तिचे सुरुवातीचे शिक्षण उन्नाव जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातून केले. यानंतर तिने बीटेक केले आणि एका कंपनीत 3 वर्षे कामही केले. यासोबतच तिने आयआयएममधून पीएचडीही केली आहे. अभ्यासात ती नेहमीच टॉपर राहिली आहे. 

सुरुवातीच्या टप्प्यात दिव्याला यूपीएससी परीक्षेत अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागले. तिने UPSC ची तयारी सुरू केली, पण पहिल्या प्रयत्नात 4 गुणांनी अपयश आले. दुसऱ्या प्रयत्नात तिने परीक्षा उत्तीर्ण केली, पण कमी रँकमुळे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र, 2020 मध्ये दिव्याने तिसर्‍या प्रयत्नात तिचे स्वप्न पूर्ण केले. यावेळी तिने 28 वी रँक मिळवली आणि ती आयएएस अधिकारी बनली. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगEducationशिक्षणIndian Armyभारतीय जवान