शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची वेळ पूर्ववत न ठेवल्यास छंदांना वेळ कसा द्यायचा? मुलांच्या पुरेशा झोपेची जबाबदारी पालकांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 07:06 IST

सध्या विद्यार्थी शाळेतून आले की खेळाचा सराव करतात. कला, छंद वर्ग व काहीजण अतिरिक्त शिकवणीसाठी जातात.

- प्रशांत बिडवेलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पूर्व प्राथमिक ते इयत्ता चाैथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरवल्यास पर्यायाने अनेक शाळांत माध्यमिक वर्ग उशिरा भरवावे लागतील. त्यामुळे कला, क्रीडा यासह  छंदांना वेळ कसा द्यायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकणार आहे. त्यामुळे प्राथमिक वर्ग भरण्याची वेळ पूर्वीप्रमाणेच ठेवावी, अशी मागणी पालक, मुख्याध्यापक व वाहतूक संघटनांकडून हाेत आहे. 

सध्या विद्यार्थी शाळेतून आले की खेळाचा सराव करतात. कला, छंद वर्ग व काहीजण अतिरिक्त शिकवणीसाठी जातात.  शाळेची वेळ बदलल्यास यासाठी पुरेसा वेळ देता येणार नाही. मुलांवर प्रयाेग करण्याऐवजी शाळांची वेळ पूर्ववत ठेवावी, मुलांना पुरेशी झाेप मिळण्याची जबाबदारी पालकांनी घेतली पाहिजे. माध्यमिकचे वर्ग सकाळी आणि प्राथमिक वर्गाची शाळा दुपारी भरवणे हा पर्याय उत्तम ठरू शकताे, असेही काही पालक संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. 

अशी घ्या मुलांच्या झाेपेची काळजी मुलांचा माेबाइल, टीव्हीवरचा वेळ कमी करण्यासाठी पालकांनी त्याचा वापर कमी करावा. पालकांनी दिनक्रम निश्चित करून मुलांना पुरेशी झाेप मिळेल, याकडे लक्ष दिले पाहिजे.- डाॅ. हमीद दाभाेलकर, मानसाेपचार तज्ज्ञ

अनेकदा पालक घरापासून दूर शाळांत प्रवेश घेतात. त्यामुळेही मुलांची धावपळ होते. शाळेचे शुल्क भरून जबाबदारी संपत नाही, तर त्यांनी मुलांची झाेप, सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शाळांची पूर्वीची वेळच कायम ठेवली पाहिजे.- दिलीप सिंह विश्वकर्मा, अध्यक्ष, महापॅरेंटस असाेसिएशन 

शिक्षण विभागाने घाईत शाळेची वेळ बदलण्याचा निर्णय लादण्यापेक्षा शहर-ग्रामीण भागातील स्थानिक प्रश्न तसेच पालकांची मते जाणून घ्यावीत आणि त्यानुसार शाळेची वेळ बदलली पाहिजे. - मुकुंद किर्दत, समन्वयक, आप पालक युनियन

टॅग्स :Schoolशाळा