शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’ रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 11:40 IST

कोरोनाच्या साथीने वैद्यकीय क्षेत्रातील उणिवा समोर आणल्या. केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर महानगरांत डॉक्टरांची संख्या कमी असल्याचे चित्र स्पष्ट झाले, असे याचिकाकर्ते रवी नायर यांनी याचिकेत म्हटले आहे.

मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (नीट) रद्द करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबईच्या मीडिया सल्लागाराने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. इच्छुक वैद्यकीय पदवीधारकांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाला बसण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून पुरेसे तज्ज्ञ डॉक्टर जनतेसाठी उपलब्ध होतील, असे याचिकेत म्हटले आहे.कोरोनाच्या साथीने वैद्यकीय क्षेत्रातील उणिवा समोर आणल्या. केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर महानगरांत डॉक्टरांची संख्या कमी असल्याचे चित्र स्पष्ट झाले, असे याचिकाकर्ते रवी नायर यांनी याचिकेत म्हटले आहे.याबाबत विधि, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली असून त्यांच्या मते वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (नीट) घेण्यापेक्षा पीजीच्या जागा दुप्पट करणे योग्य आहे. एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला थेट बसू द्यावे, असे याचिकेत म्हटले आहे.पीजी नीटला पर्याय म्हणून पालिकेने सहा मिनी वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा आणि वैद्यकीय जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जर हा पर्याय देशातील ७२० जिल्ह्यांनी निवडला तर देशात सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय जागा तीनपटीने वाढतील. पीजी नीटमुळे केवळ डॉक्टरांच्या संख्येवर मर्यादा आणली नाही तर जागा मिळत नाही म्हणून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारही होतो, असे नायर यांनी याचिकेत म्हटले आहे.

पीजी नीट रद्द करावी किंवा पीजी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा दुप्पट करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयexamपरीक्षाMedicalवैद्यकीय