शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

दृष्टी गेली तरीही आईनं मुलाला असं बनवलं UPSC टॉपर, देशातून ७ वी रँक पटकावली!; सम्यकच्या जिद्दीची कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 20:56 IST

दिल्लीच्या सम्यक जैनने देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या परीक्षेच्या निकालात म्हणजेच UPSC मध्ये टॉप १० मध्ये सातवा क्रमांक मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे.

नवी दिल्ली-

दिल्लीच्या सम्यक जैनने देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या परीक्षेच्या निकालात म्हणजेच UPSC मध्ये टॉप १० मध्ये सातवा क्रमांक मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे. सम्यकला दृष्टीहिन आहे, पण टॉप १० मध्ये येऊन त्याने लाखो विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखवून दिला आहे. देशाच्या सर्वात मोठ्या परीक्षेची तयारी करणाऱ्या किंवा त्यांच्या तयारीचा विचार करणाऱ्या अशा सर्व लोकांना सम्यकनं दाखवून दिलं की कठोर परिश्रम, समर्पण आणि कधीही हार न मानण्याच्या जिद्दीनं काहीही साध्य करता येतं.

"दोन वर्षांपूर्वी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. मार्च २०२० मध्ये तयारी सुरू केली आणि त्याचवर्षी परीक्षा देखील दिली होती. पण यश मिळू शकलं नव्हतं. पहिला प्रयत्न माझ्यासाठी एक चाचणी होती. यूपीएससी परीक्षेत कोणती आव्हानं आणि अडचणी येतात हे मला पाहायचं होतं", असं सम्यक म्हणाला. या यशाचं श्रेय सम्यकनं आई-वडिलांना दिलं. विशेषतः आई वंदना जैन यांचा त्यानं आवर्जुन उल्लेख केला. वंदना जैन स्वत: एअर इंडियामध्ये काम करत आहेत पण त्यांनी व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून सम्यकला पाठिंबा दिला आणि आपल्या मुलाला टॉपर बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

आई आणि मुलाचं नातं कसं अभेद्य असतं याचं दर्शनच सम्यकच्या यशातून दिसून आलं आहे. "माझा आणि सम्यकचा एकमेकांशी चांगला संवाद होताच. सम्यक जेव्हा बोलायचा ते मी लिहून काढायचे. यासाठी आम्ही खूप सरावही केला", असं सम्यकच्या आई वंदना जैन यांनी सांगितलं. सम्यक जे बोलायचा ते नीट समजून घेऊन ते लिहायचं काम वंदना जैन यांनी केलं. 

अनुवांशिक रोगामुळे सम्यकची दृष्टी कमी झालीवयाच्या १८ व्या वर्षी सम्यकची दृष्टी गेली तेव्हा त्याच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. सम्यकने सांगितलं की, 'मी 18 वर्षांचा होतो तेव्हा असं आढळून आलं की मला एक अनुवांशिक आजार आहे ज्यावर कोणताही इलाज नाही. यामध्ये समस्या वाढतच जाते. आता मी दृष्टिहीन आहे. मला वाचता येत नाही आणि लिहिता येत नाही म्हणून मला तोंडी सांगावं लागतं आणि माझी आई ते लिहून काढायची"

UPSC शिवाय दुसरा कोणता चांगला मार्ग नाहीसम्यकचा जन्म दिल्लीत झाला. वयाच्या १३व्या वर्षापर्यंत दिल्लीत वास्तव्य केलं. त्याचं शालेय शिक्षण शाहदरा, दिल्ली येथं झालं. त्यानंतर एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या वडिलांची मुंबईत बदली झाली आणि तेथून सम्यकनं दहावी-बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर इंजिनीअरिंगचा अभ्यास सुरू केला पण काही कारणांमुळे त्याला सोडावं लागलं आणि नंतर सम्यक दिल्लीला आला. त्यानं दिल्ली विद्यापीठात BA इंग्लिश ऑनर्स केलं. त्यानंतर पुन्हा आयआयएमसी अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनमधून इंग्रजी पत्रकारितेचा कोर्स केला आणि तेथून पुन्हा जेएनयूमध्ये प्रवेश घेतला. तिथं सम्यकनं आंतरराष्ट्रीय संबंधांचं शिक्षण घेतलं. जेएनयूमध्ये शिकत असताना सम्यकला यूपीएससीसाठीची प्रेरणा मिळाली आणि त्याने तयारी सुरू केली. पत्रकारितेदरम्यान देश जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची खूप चांगली संधी मिळाल्याचं सम्यक म्हणतो. देशासाठी आणि देशाची परिस्थिती बदलण्यासाठी UPSC पेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही असं सम्यकला वाटतं.

आई-वडिलांनी केली सर्वाधिक मदतसम्यकच्या म्हणण्यानुसार त्याला त्याच्या आई-वडिलांकडून जास्त मदत मिळाली. सम्यकला डिजिटल स्वरूपातील पुस्तकांची गरज असल्यानं सर्व ती उपलब्ध होतील याची काळजी आईनं घेतली होती. तर त्याच्या मित्रांनीही मदत केली. मार्गदर्शन केलं, नोट्स दिल्या आणि सर्वतोपरी मदत केली. चर्चा आणि वादविवादातही मदत केली. सम्यक दिवसातून सुमारे ७ तास अभ्यास करायचा, त्यात तो ब्रेकही घेत असे. सम्यक म्हणतो की त्याला या निकालाची कधीच अपेक्षा नव्हती. आपलं नाव कोणत्या ना कोणत्या प्रकारे यादीत यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना होती. परीक्षेचा निकाल लागल्यापासून फोन वाजणं थांबलेलं नाही, लोकांचे सारखे फोन येत आहेत, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, असंही सम्यकनं सांगितलं. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगEducationशिक्षण