शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या पहिल्याच पेपरमध्ये घोळ! प्रश्नामध्येच उत्तर दडलं, सहा गुणांवरती निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 17:14 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. यंदा मुंबई विभागातून ३ लाख ४४ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली.

मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. यंदा मुंबई विभागातून ३ लाख ४४ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. मुंबईतील ६३५ केंद्रांवर परीक्षा सुरू झाली. आज पहिल्याच पेपरमध्ये घोळ झाल्याचे समोर आले आहे. आज बारावीचा पहिला इंग्रजी या विषयाचा पेपर होता. यात तीन प्रश्नांमध्ये घोळ असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता या सहा मार्कांसाठी बोर्ड काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 

आजपासून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली. आज इंग्रजी या विषयाचा पहिलाच पेपर होता. पहिल्याच पेपरमध्ये प्रश्नांमध्ये घोळ झाल्याचे समोर आले, इंग्रजी पेपरच्या पान नंबर १० वर प्रश्न क्र. ३ वर आणि त्यातील उपप्रश्न A3, A4 आणि A5 मध्ये प्रश्नच दिलेला नाही यात A5 आणि A5 मध्ये प्रश्नच दिलेला नाही, तर A4 मध्ये थेट उत्तरच दिलेले आहे. यामुळे बारावीचे विद्यार्थी संभ्रमात आहेत. याबाबत आता बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे. यावरच लवकरच निर्णय घेऊ असं बोर्डाने सांगितले आहे. तीनही प्रश्न ६ गुणांचे आहेत. त्यामुळे आता या प्रश्नावर बोर्ड काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.   

All The Best! आजपासून बारावीची परीक्षा; मुंबईत ३ लाखांहून अधिक विद्यार्थी

समुपदेशन आणि हेल्पलाइनची सोय

मुंबई विभागीय मंडळाच्या अंतर्गत असलेल्या परीक्षा केंद्रांवर बारावी परीक्षेची आवश्यक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण येऊ नये म्हणून मंडळाकडून प्रत्येक विभागीय मंडळामध्ये समुपदेशन आणि हेल्पलाइनची सोय उपलब्ध करून दिल्याचेही बोरसे यांनी सांगितले. मुंबईतील परीक्षकांची संख्या ६७ आहे. शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, म्हणून सोमवारपर्यंत अर्ज स्वीकारल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सगळी काळजी शाळा व्यवस्थापनाकडून घेतली जाईल. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्याव्यात. परीक्षा काळातही समुपदेशन उपलब्ध राहणार असल्याने काही अडचणी, समस्या आल्यास विद्यार्थ्यांनी त्यावर संपर्क साधावा. याशिवाय मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या अतिरिक्त दहा मिनिटांच्या सुविधेचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा.

- सुभाष बोरसे, सचिव, मुंबई विभागीय मंडळ 

टॅग्स :Educationशिक्षणHSC / 12th Exam12वी परीक्षा