शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीला अच्छे दिन येईनात; अभियंते फिरवत आहेत अभ्यासक्रमाकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 06:19 IST

भारतात अभियांत्रिकी शिक्षण व प्रशिक्षण ज्या पद्धतीने दिले जाते, त्यात आमूलाग्र बदल घडवायला हवे आहेत

सीमा महांगडेमुंबई :  गेल्या दशकभरात अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांचे फुटलेले पेव आणि या पार्श्वभूमीवर रिक्त राहणाऱ्या जागा यांवर नियंत्रण आणण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता न देण्याची भूमिका एआयसीटीईने घेतली. तरीही शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जुलैपर्यंत देशात एआयसीईटीईची मान्यता असलेल्या अभियंत्रिकी आणि व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या तब्बल १४ लाखांहून अधिक जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये देशातील शासकीय अभियांत्रिकी आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील १ लाख ७६ हजार ४२८ तर खासगी अभियांत्रिकी व व्यावसायिक शिक्षण संस्थांमधील १२ लाख ४८ हजार १२५ जागांचा समावेश आहे. या आकडेवारीवरून देशातील विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी होण्याकडचा कल  कसा कमी होत आहे हे स्पष्ट होत आहे. 

देशाच्या अभियांत्रिकी व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शासकीय व खासगी शिक्षण संस्थांमधील प्रवेशाची स्थिती काय आहे? एकूण किती जागा उपलब्ध आहेत आणि किती रिक्त आहेत, यासंबंधीची माहिती जुलै २०२२ मध्ये लोकसभेत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली. २०२० च्या स्किल इंडिया अहवालानुसार रोजगार निर्मितीमध्ये अभियांत्रिकी क्षेत्रात झालेली घट आणि उमेदवारांना असलेली मागणी परस्परविरोधी आहे. सरकारची धोरणे बरोबर आहेत काय? अभियांत्रिकीचे शिक्षण आज नोकरीच्या दृष्टीने योग्य आहे काय? विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये अभ्यासक्रमातून शिकवली जातात का? पदवी-पदविका घेऊनही नोकरी का मिळत नाही? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले असून, या क्षेत्रातील शिक्षण व नोकरी हे समीकरण बिघडले असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

भारतात अभियांत्रिकी शिक्षण व प्रशिक्षण ज्या पद्धतीने दिले जाते, त्यात आमूलाग्र बदल घडवायला हवे आहेत आणि अभियंत्यांना केवळ त्यांच्या शिक्षणास अनुकूल असे वातावरण प्रदान न करता, या व्यावहारिक, वास्तविक जगाच्या परिस्थितीत या शिक्षणाचा प्रभावी वापर करण्यास सक्षम बनविल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.