शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

Education: हार्वर्ड, केंब्रिज विद्यापीठे आली नाही तर काय उपयाेग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 12:43 IST

Education:

- भूषण पटवर्धन (माजी उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग)रताला विश्वगुरू म्हणून पुनर्स्थापित व्हायचे असेल तर इथल्या भूमीतच सर्वसामान्यांना परवडेल अशा मोबदल्यात उच्च दर्जाची शिक्षणव्यवस्था उपलब्ध व्हायला हवी,’ यावर २०२०च्या ‘राष्ट्रीय शिक्षण धोरणा’त (एनईपी) भर देण्यात आला आहे. या धोरणातील १२.७ आणि १२.८ क्रमांकाच्या मुद्द्यांमध्ये ‘शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण’ यावर भाष्य करताना हे विस्तृतपणे येते. याचाच आधार घेत ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ने (यूजीसी) परदेशी विद्यापीठांना भारताचे अंगण मुक्तपणे खुले करून दिले आहे. परंतु, फारसा विचार न करता परदेशी विद्यापीठांच्या स्वागतासाठी पायघड्या घालण्याच्या या प्रकारात ‘भारत’च बेदखल होण्याची शक्यता आहे.

भारतीयत्वाला डावललेविश्वगुरू म्हणून भारताचे स्थान उंचावण्यासाठी इथल्या भूमीत निपजलेल्या तत्त्वज्ञान, भाषा, आयुर्वेद औषधोपचार, योग, कला, संगीत, इतिहास, संस्कृती इत्यादी विषयांबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाशी समतूल्य असे विज्ञान, समाजविज्ञानविषयक अभ्यासक्रम शिकण्याची संधी देणारे शैक्षणिक वातावरण भारतात निर्माण व्हायला हवे. त्यासाठी जमेल तिथे निवासी प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून द्यायला हवे. जेणेकरून बाहेरचे विद्यार्थी भारताकडे आकर्षित होतील आणि देशातील उत्पन्न वाढीबरोबर बाहेर जाण्याचा ओघ मंदावेल, अशी मांडणी ‘एनईपी’त करण्यात आली आहे.परंतु, आपल्या येथील शिक्षणसंस्थांना समपातळीवर येण्याची संधी न देता, त्यांना कठोर नियमांतून, कायद्यातून मुक्त न करता त्यांची स्पर्धा सर्वपरीने मुक्त असलेल्या परदेशी विद्यापीठांशी लावण्यात आली आहे.

गल्लाभरू विद्यापीठांकरिता…परदेशातील कुठली विद्यापीठे भारतात येण्यासाठी इच्छुक आहेत, हे सरकारने जाहीर करावे. हार्वर्ड, केंब्रिजसारखी विद्यापीठे भारतात येण्यास तयार नसतील तर या धोरणाचा काहीच फायदा नाही. मग गुणवत्तेत सुमार दर्जाची आणि केवळ भारताकडे बाजारपेठ म्हणून पाहणारी तद्दन गल्लाभरू विद्यापीठेच भारतात येणार का? इंग्लडसारख्या देशांतही अशी दर्जाहीन विद्यापीठे ढिगाने आहेत. पालक घरंदारं विकून आपल्या मुलांना तेथे शिकवतात. शेवटी नोकरी नसल्याने विद्यार्थी-पालक देशोधडीला लागले आहेत. हेच आता भारतात होणार.

विद्यार्थी हितही नजरेआडइथल्या शिक्षण संस्थांबरोबरच गरीब हुशार मुलांनाही त्याचा फटका बसणार आहे. विद्यार्थी कल्याण ‘एनईपी’च्या केंद्रस्थानी आहे. परंतु, नव्या धोरणात ते डावलले जाणार आहेत.

संसदेत चर्चा हवीमुळात या प्रकारचे नियम करण्याचा यूजीसीला अधिकार नाही. परदेशी विद्यापीठांना भारतात परवानगी देण्याचा निर्णय मूलभूत व दूरगामी परिणाम करणारा आहे. त्या संबंधातील स्वतंत्र कायदा संसदेत संपूर्ण चर्चेअंती मंजूर व्हायला हवा होता. परंतु, यावर चर्चा तर झाली नाहीच. शिवाय यूजीसीच्या मूळ आराखड्यात सुचविण्यात आलेल्या शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासकांच्या सूचनांकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे परदेशी विद्यापीठांना भारतात परवानगी देण्याचा निर्णय घाईघाईने आणि पूर्ण विचारांती घेतला गेला नसल्याचे खेदाने नमूद करावे लागेल.

हे कुणासाठी? एनईपीत जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभरात येणाऱ्या संस्थांना भारतात परवानगी देण्याची शिफारस होती. परंतु, आता ती ५०० वर आणण्यात आली आहे. ते कुणासाठी करण्यात आले?

अंमलबजावणीचा अभावकोणतेही धोरण गांभीर्याने न राबवता केवळ गाजावाजा करण्याची पद्धत आपल्याकडे रूळत चालली आहे. भारतातील दर्जेदार शिक्षण संस्थांना एमिनन्स म्हणून दर्जा द्यायचा ठरले होते. परंतु, ही योजना प्रभावीपणे राबवलीच गेली नाही. या धरसोडवृत्तीमुळे ‘गिफ्ट सिटी’ प्रयोगाचेही तेच झाले. पहिल्या वर्षांत आलेले तीन प्रस्ताव सोडले तर त्याचे पुढे काही झाले नाही.(शब्दांकन : रेश्मा शिवडेकर )

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण