शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Education: यंदा पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम १०० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 13:24 IST

Education News: २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत पहिली ते बारावीच्या सर्व परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार असून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णयही जाहीर झाला आहे. 

मुंबई : राज्यात दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने, राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ७५ टक्के अभ्यासक्रमांवर घेतल्या, तर प्रात्यक्षिकांसाठी ४० टक्के अभ्यासक्रम होता. तसेच पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती, मात्र २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत पहिली ते बारावीच्या सर्व परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार असून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णयही जाहीर झाला आहे. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने दोन वर्षे शाळा सलग सुरू नव्हत्या. अनेक ठिकाणी शाळा बंद होत्या. या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण झाले, मात्र अपुरी इंटरनेट सुविधा, नेटवर्क नसणे, ऑनलाइन शिक्षणासाठी साधने नसणे, अशा विविध समस्यांमुळे ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा आल्या. यावर उपाय म्हणून एससीईआरटी (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद)कडून इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती. त्यामुळे या इयत्तांच्या परीक्षा या ७५ टक्के अभ्यासक्रमावरच घेण्यात आल्या. यंदाचे शैक्षणिक वर्ष हे वेळेवरच सुरू झाले असून विद्यार्थ्यांच्या शाळा या नियमित पद्धतीने, पूर्ण वेळ सुरू आहेत. विदर्भातील शाळाही येत्या २७ जूनपासून सुरू होणार असल्याने सद्य:स्थितीत शाळांच्या वेळेत किंवा तासिकांत कोणताही अडथळा नसून त्या त्या योग्य पद्धतीने सुरू असल्याने अभ्यासक्रम पूर्ववत म्हणजे १०० टक्के करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. 

१०० गुणांच्या परीक्षेसाठी तीन तासांचा अवधीकोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा वेग मंदावला होता. शिवाय बऱ्याच कालावधीनंतर  परीक्षांना सामोरे जाणार होते. त्यामुळे राज्य मंडळाने विशेष बाब म्हणून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विषयानुसार १५ ते ३० मिनिटांचा अतिरिक्त कालावधी दिला होता. मात्र यापुढे परीक्षेसाठी कोणताही अधिक कालावधी राहणार नाही. त्यानुसार विद्यार्थ्यांना १०० गुणांच्या परीक्षेसाठी तीन तासांचा कालावधी राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण