शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Education: निकाल लागला, प्रवेश अर्ज वेळेत भरा! अकरावी, आयटीआय, डिप्लोमा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये रंगणार चुरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 08:39 IST

Education News:

 मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाला असला, तरी विद्यार्थ्यांच्या पुढच्या प्रवेशाची परीक्षा आणि त्याची स्पर्धा अद्याप कायम असून केंद्रीय मंडळाचे निकाल लागले नसल्याने विद्यार्थी आणि पालकांची धास्ती वाढली आहे. विद्यार्थ्यांनी त्याची वाट न पाहता आपल्याला ज्या शाखेला, अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्यासाठी अर्ज नोंदणी करून ठेवण्याचे आणि आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन विविध संचालनालयांकडून करण्यात येत आहे.

दहावीनंतर आयटीआय, अकरावी, डिप्लोमा प्रवेश हे प्रवेशाचे मुख्य पर्याय उपलब्ध असून त्यांच्या अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी किमान विहित वेळेत अर्ज नोंदणी करून प्रवेशाच्या स्पर्धेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन विविध संचालनालयाकडून करण्यात येत आहे.   मागील वर्षीपेक्षा यंदा निकालात व गुणवंतांच्या संख्येत घट असली, तरी केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांमुळे नामांकित महाविद्यालयातील, शिक्षण संस्थातील उपलब्ध जागांसाठीची नेहमीची चुरस रंगणार आहे, हे निश्चित असल्याचे मत प्राचार्य व्यक्त करीत आहेत. सद्यस्थितीत केवळ केंद्रीय मंडळांचा निकाल न लागल्याने चित्र स्पष्ट नाही, मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली पूर्वतयारी न सोडता किमान अर्ज नोंदणीची प्राथमिक प्रक्रिया पार पाडत पहिला टप्पा पूर्ण करावा.

अकरावी प्रवेशाचा दुसरा टप्पा लवकरच राज्यातील पुणे व पिंपरी-चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक या महापालिका क्षेत्रांत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया ३० मेपासून सुरू झाली असून दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या अर्जाचा भाग २ भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. 

डिप्लोमासाठी अर्ज   भरण्याची प्रक्रिया सुरूदहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. या प्रवेशासाठी साधारण एक लाख जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतीही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहेत. आयटीआयची प्रवेश प्रक्रिया व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीव्हीईटी) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया १७ जूनपासून सुरू झाली आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र