शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Education News:दहावी, बारावीच्या परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच घ्या! मुख्याध्यापक संघटनेसह, तज्ज्ञांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 09:36 IST

Education News: शिक्षण मंडळाकडून वेळापत्रक जाहीर झालेले असताना दहावी, बारावीच्या परीक्षा आणखी एक महिना पुढे ढकलणे हितावह ठरणार नसल्याचे मत राज्य शाळा मुख्याध्यापक संघाकडून व्यक्त होत आहे.

मुंबई :  शिक्षण मंडळाकडून वेळापत्रक जाहीर झालेले असताना दहावी, बारावीच्या परीक्षा आणखी एक महिना पुढे ढकलणे हितावह ठरणार नसल्याचे मत राज्य शाळा मुख्याध्यापक संघाकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्रे लिहिली असून दहावी, बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी शिक्षणाधिकारी, बोर्डाचे पदाधिकारी यांच्यासमवेत ऑनलाईन बैठक घेत दहावी, बारावी परीक्षांच्या आयोजनाचा आढावा घेतला. यादरम्यान अनेक विद्यार्थी, पालक पुरेशा सरावाअभावी परीक्षा पुढे ढकलव्यात, अशी मागणी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शिक्षणाधिकारी आणि बोर्डाने दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलत येतात का? त्यांचा कालावधी कमी करता येतो का? याची चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा पुढे ढकलल्या जाणार असे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे महेंद्र गणपुले यांनी दिली. अनेक ग्रामीण व शहरी भागातील दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा पुरेसा सराव आणि मनाची तयारी झाली असताना परीक्षा पुढे ढकलण्याचा घाट घालणे  म्हणजे शैक्षणिक हिताच्या दृष्टीने घातक असल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षांच्या नियोजनाचा आराखडा  व पद्धती ऐनवेळी बदलणे शक्य  नाहीच, पण ऐनपरीक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षांबाबतीत  काही धोरणात्मक निर्णय घ्यायचा झाल्यास आधी तो मंजूर करून  घ्यावा आणि मगच ती माहिती  प्रसिद्ध करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.  

टॅग्स :examपरीक्षाssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस