शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ प्राध्यापकांची दिवाळी होणार गोड; प्रलंबित मानधन देण्याची मंत्र्यांची सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 06:56 IST

सरकारच्या दि. २२ ऑक्टोबर २०२१च्या निर्णयानुसार उच्चशिक्षण संचालनालयाच्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयात तासिका तत्त्वावरील कार्यरत प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत, तसेच २०२१-२२ पासूनचे मानधन प्रलंबित न ठेवता दिवाळीपूर्वीच करा. हे मानधन देण्यासंदर्भात उच्चशिक्षण संचालकांनी दर तीन दिवसांनी आढावा घेण्याबाबत सक्त सूचना उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिल्या. त्यामुळे आता राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या प्राध्यापकांची दिवाळी गोड होणार आहे.

सरकारच्या दि. २२ ऑक्टोबर २०२१च्या निर्णयानुसार उच्चशिक्षण संचालनालयाच्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयात तासिका तत्त्वावरील कार्यरत प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. परंतु राज्यातील तासिका तत्त्वारील बहुतांश  प्राध्यापकांचे मानधन २०२१ पासून मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आली आहे. या अनुषंगाने सर्व संबंधित विभागीय सहसंचालक, उच्चशिक्षण यांनी तपासणी करून २४ ऑक्टोबरपूर्वी त्यांच्या महाविद्यालयातील पात्र तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन देण्याबाबत प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत दिरंगाई निदर्शनास आल्यास विभागीय सहसंचालक यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही पाटील यांनी नमूद केले.

दर तीन दिवसांनी घेणार आढावा संचालक, उच्चशिक्षण यांनी आपल्या स्तरावर दर तीन दिवसांनी आढावा घेत २२ ऑक्टोबरपूर्वी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन प्रलंबित राहणार नाही, याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  त्यानुसार कार्यवाहीकरून वेळोवेळी सरकारला माहिती देण्यात यावी, असे आदेश सहसचिव द. रा. कहार यांनी दिले आहेत.