शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

डिप्लोमा प्रवेशाला सुरूवात; एक लाखाहून अधिक जागांकरिता तीन प्रवेश फेऱ्या

By रेश्मा शिवडेकर | Updated: May 28, 2024 19:30 IST

डिप्लोमाला २०२०-२१ मध्ये उपलब्ध जागांच्या ६० टक्के इतके प्रवेश झाले होते. ही टक्केवारी २०२३-२४मध्ये ८७वर गेली आहे

मुंबई - दहावीनंतरच्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाच्या जवळपास ४०० शिक्षण संस्थांमधील एक लाख पाच हजार जागांवरील प्रवेशाकरिता तीन कॅप फेऱ्या घेण्यात येणार आहेत.

यंदा डिप्लोमा प्रवेशात एसईबीसी (मराठा आरक्षण) विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा आरक्षित असतील. तसेच वर्किंग प्रोफेशनल आणि बारावीच्या उत्तीर्णांना थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला जाणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. मंगळवारपासून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू कऱण्यात आली.

डिप्लोमाला २०२०-२१ मध्ये उपलब्ध जागांच्या ६० टक्के इतके प्रवेश झाले होते. ही टक्केवारी २०२३-२४मध्ये ८७वर गेली आहे. गेली चार वर्षे डिप्लोमा प्रवेशात वाढच होते आहे. डिप्लोमात सिव्हील, इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल, अणुविद्युत, कॉम्प्युटर, केमीकल या मुख्य शाखा आहेत. डिप्लोमाच्या प्रवेशासाठी तंत्रशिक्षण विभागाच्या https://dte.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करता येईल.

डिप्लोमाचे प्रवेश

वर्ष…………शिक्षणसंस्था…. झालेले प्रवेश…… प्रवेशाची टक्केवारी

२०२०-२१……..३७६…………….६२,१२२……………६०२०२१-२२……..३६७…………….६९,७०५……………७०

२०२२-२३……३६५…..………….८४,४५२…………….८५

२०२३-२४……३८८………………८६,४६५…………….८७

यंदा उपलब्ध जागा

संस्था - ३९०

जागा - १.०५ लाख

प्रवेशासाठी सुविधा केंद्रे - ३१६

कॅप फेऱ्या - तीन

ठळक बदल

* एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी एकूण प्रवेश क्षमतेच्या १० टक्के जागा आरक्षित

* थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी वर्किंग प्रोफेशनलकरिता स्वतंत्र तुकडी. हे वर्ग सकाळी, रात्री व सुटीच्या दिवशी घेण्यात येतील.

* थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश - विद्यार्थ्याना पदविका अभ्यासक्रमाची शाखा  त्याने बारावी परीक्षेत उत्तीर्ण केलेल्या विषयानुसार  निवडता येईल.