शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नवे शैक्षणिक धोरण कळले का? जूनपासून पॅटर्न बदलणार, महाविद्यालयांची अद्याप तयारी नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 14:08 IST

अभियांत्रिकीबरोबरच मेडिकल एज्युकेशनही  मराठीत शिकविले जाणार...

मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणाची तंतोतंत अंमलबजावणी २०२३-२४ शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. विद्यापीठ, महाविद्यालयांनी गुणवत्तेचा स्तर वाढवावा. नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांना नोटीस देण्यात आली होती. परंतु, महाविद्यालयांची अद्याप तयारी दिसत नाही आणि पॅटर्नबाबतही साशंकता आहे. 

नव्या शैक्षणिक धोरणात २१ मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. विद्यापीठांवर धोरण राबविण्याची मोठी जबाबदारी आहे. आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम, कौशल्याभिमुख अभ्यासक्रम, उद्योजकांचा सहभाग, क्लस्टर महाविद्यालये, मातृभाषेतून शिक्षण, सीबीसीएस पद्धती, एबीसी अशा विविध पातळीवर विद्यापीठांचे काम सुरू आहे. अभियांत्रिकीबरोबरच मेडिकल एज्युकेशनही  मराठीत शिकविले जाणार आहे. शैक्षणिक धोरण भविष्यात अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. 

काय असणार महाविद्यालयीन शिक्षणात बदल पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतील. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय विद्यार्थ्यांना असेल. याला ‘ऑनर्स पदवी’ असे म्हटलं जाईल. तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम कायम राहील. 

मल्टिपल एन्ट्री व एक्झिटपदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण सुरू असताना काही अटींसह विद्यार्थ्यांना मध्येच शिक्षण सोडून पुन्हा प्रवेश घेऊन आपले शिक्षण पूर्ण करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना सात वर्षांची मुदत दिली जाणार आहे. यापूर्वी ही मुदत सहा वर्षांपर्यंत होती.

विद्यापीठात प्रवेश शक्य एखादा विद्यार्थी विज्ञान शाखेत आहे; पण त्याला जर दुसऱ्या शाखेचा एखादा अभ्यास करायचा असेल तर तो करणे आता शक्य होणार आहे. इतकेच नव्हेतर, ग्रेड सिस्टीममुळे त्या विद्यार्थ्याला कोणत्याही विद्यापीठात प्रवेश घेणे शक्य होणार आहे. 

एकसमान क्रेडिट पद्धती आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम, कौशल्याभिमुख अभ्यासक्रम, उद्योजकांचा सहभाग, क्लस्टर महाविद्यालये, मातृभाषेतून शिक्षण, सीबीसीएस पद्धती, एबीसी अशा विविध पातळीवर विचार होणार आहे. पदवीच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रेडिट गुणांकन पद्धतीनुसार अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे.

प्राचार्य वर्तुळातील सूर : शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी नवीन  वर्षापासून करण्यात येईल, असे मंत्र्यांनी जाहीर केले. मात्र, हे धोरण कशापद्धतीने अंमलात आणणार आहे, त्यासाठी काय पूर्वतयारी करण्यात येणार आली आहे याविषयी सर्व स्तरांवर संभ्रम आणि साशंकतेचे वातावरण आहे. त्यामुळे यंत्रणांनातही गैरसमज आणि गोंधळाची स्थिती दूर करण्यासाठी सुरुवातीला शाळा असो महाविद्यालय यांना हे धोरण अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन केले पाहिजे.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ