शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकात कोरी पाने असूनही वह्यांचे ओझे कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 09:37 IST

पुस्तकात माझी नोंद असे लिहिण्यात आले असून, ‘बालभारती’चा वॉटर मार्कही छापण्यात आला आहे. मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत ही पुस्तके ‘बालभारती’कडून राज्यात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्याच्या निर्णयाची यंदापासून प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी होत आहे. नवीन पुस्तकाच्या रचनेनुसार, इयत्तानिहाय सर्व विषयांचे चार भाग करण्यात आले आहेत;  तसेच प्रत्येक पुस्तकामध्ये एक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही वह्या लागणार असल्याने दप्तरांचे ओझे कायम राहणार आहे. 

पुस्तकात माझी नोंद असे लिहिण्यात आले असून, ‘बालभारती’चा वॉटर मार्कही छापण्यात आला आहे. मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत ही पुस्तके ‘बालभारती’कडून राज्यात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पाठ्यपुस्तक विक्रेत्यांना आधी जुन्या पुस्तकांचा साठा संपविण्याच्या सूचना असल्याने विद्यार्थ्यांना हवे ते पुस्तक घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. नवीन पुस्तकांचे पहिल्या टप्प्यातील छपाईचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळणार आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी कमीत कमी वह्या आणाव्यात, यासाठी प्रत्येक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आले असून, या पानावर दोन्ही बाजूंना धड्याशी संबंधित नोंदी करता येऊ शकणार आहेत.  

 ही पुस्तके अद्याप विनाअनुदानित/ खासगी शाळांसाठी बाजारात उपलब्ध नाहीत.  खुल्या बाजारात पुरवठा होणाऱ्या सर्व पाठ्यपुस्तकांचे मंडळाच्या मूल्यांकन सूत्रांनुसार नव्याने मूल्यांकन करून त्यानुसार पुस्तकांच्या किमती निश्चित करण्यात येणार आहेत. 

 पुस्तकातील नोंद होणाऱ्या पानावरील वॉटर मार्कमुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणात अडचणी येणार असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.  या योजनेमुळे पुस्तकाचा पुनर्वापर हे तत्त्व शिक्षण विभागाकडून गुंडाळून ठेवले जाणार असून, पुनर्वापर न झाल्यामुळे दरवर्षी कित्येक टन पुस्तकांची रद्दी निर्मिती होणार असल्याचे बोलले जात आहे.

वह्या विकत घ्याव्याच लागणार

गृहपाठ किंवा वर्गपाठासाठी स्वतंत्र वह्या करण्याचा पर्याय शिक्षण विभागाने दिला आहे. त्यामुळे वहीचे पान पुस्तकामध्ये जोडले असले, तरी संबंधित विषयांच्या वह्या आणाव्या लागणार असल्याचे राज्य मुख्याध्यापक संघाचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दप्तरातील वह्यांचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकातील पानांचा उपयोग होणार नाही; पण प्रत्येक विषयानुसार पुस्तकाचे चार भाग करण्यात आल्याने पुस्तकांचे ओझे कमी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.   

काही अवघड शब्द, संकल्पना, आकृत्या, काही महत्वाच्या पुस्तकाबाहेरील नोंदी करता येऊ शकतात. त्यामुळे आता या उपक्रमाच्या अंमलबजावणीवर हा प्रयोग किती यशस्वी होईल, हे समजेल.  - महेंद्र गणपुले, प्रवक्ता, राज्य मुख्याध्यापक संघ  

टॅग्स :Schoolशाळा