शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेश! कटऑफ नव्वदीपार, तरीही झाली घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 08:52 IST

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी : मागील वर्षीच्या तुलनेत २ ते ३ टक्क्यांची घट 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह अन्य बोर्डाच्या दहावीच्या निकालात वाढ झाल्याने अकरावी प्रवेशाचा कटऑफही वाढणार, अशी शक्यता होती. परंतु या प्रवेशाच्या पहिल्या नियमित गुणवत्ता यादीचा कट ऑफ हा गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन ते तीन टक्क्यांनी कमी झाला आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयांचा विज्ञान शाखेसह कला शाखेचाही कटऑफ या वर्षीही नव्वदीपार असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे.

मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ३७ हजार असताना केवळ १ लाख ९१ हजार विद्यार्थीच प्रवेशासाठी पात्र झाले. तब्बल ४६ हजार ८६९ विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग न भरणे, तो सबमिट न करणे, शुल्क निश्चिती न करणे अशा कारणास्तव आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण न केल्याने ते प्रवेश फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत. त्यामुळे यंदाच्या पहिल्या फेरीपासून बहुतांश गुणवंत विद्यार्थी वंचित राहिले आणि मागील वर्षीच्या पहिल्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत कटऑफ न वाढता काही ठिकाणी सारखाच राहिला तर काही ठिकाणी त्यात घसरण झाली. 

असा चढ-उतार... भवन्स महाविद्यालयाच्या कला शाखेच्या कटऑफमध्ये मागील वर्षीपेक्षा ३ टक्क्यांची, वाणिज्य ८ टक्क्यांची तर विज्ञान शाखेमध्ये ३ टक्क्यांची घसरण झाली. रुपारेल महाविद्यालयाच्या कला शाखेच्या कटऑफमध्ये ३ टक्क्यांची, वाणिज्य २ टक्क्यांची, विज्ञान शाखेत २ टक्क्यांची घसरण आहे. सेंट झेविअर्सच्या कला आणि विज्ञान शाखेच्या कटऑफमध्ये प्रत्येकी १ टक्क्याची वाढ आहे. एनएम महाविद्यालयाच्या वाणिज्यच्या कटऑफमध्ये आणि डहाणूकर महाविद्यालयाच्या कला आणि वाणिज्यच्या कटऑफमध्ये तसेच एचआर महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या कटऑफमध्येही मागील वर्षीच्या तुलनेत जास्त फरक नाही. याचप्रकारे इतर महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये चढ-उतार दिसत आहेत. 

ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना पुन्हा ३० ऑगस्टपर्यंत ती पूर्ण करण्याची संधी प्रवेश प्रक्रिया संचालनालयाकडून दिली जाणार आहे. त्यामुळे पहिल्या फेरीसाठी कटऑफ वाढला नसला तरी दुसऱ्या फेरीत तो वाढण्याची शक्यता अभ्यासक आणि प्राचार्यांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल