शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत शाळांमध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 05:25 IST

मुंबई : दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत मुंबई विभागात शाळा आणि शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. २१ आॅक्टोबर, २०१९ रोजी सार्वत्रिक निवडणूक ...

मुंबई : दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत मुंबई विभागात शाळा आणि शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. २१ आॅक्टोबर, २०१९ रोजी सार्वत्रिक निवडणूक आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ आॅक्टोबर रोजी सुट्टी देण्यात आली आहे.

राज्यातील शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण निरीक्षक कार्यालयांनी दिवाळीच्या सुट्टीतील बदलाबाबत पत्र काढले आहे, परंतु मुंबईत अद्याप दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी ठरविण्याबाबत कोणतेही पत्रक काढलेले नाही. या सोबतच शाळा पुन्हा सुरू होण्याचाही शाळांचा कालावधी निश्चित नाही. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने त्वरित निर्णय घेऊन उपसंचालक कार्यालयाने सूचना जाहीर कराव्यात आणि एकसूत्रता आणावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

दिवाळीची सुट्टी निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शिक्षक भारती, शिक्षक परिषद यांसारख्या शिक्षक संघटना आणि शिक्षकांकडून उपसंचालक कार्यालयाला पाठपुरावा करण्यात येत आहे. लेखी आदेश मिळाल्यावर या निर्णयाची अंमलबजावणी शक्य असल्याने शिक्षक या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.खासगी शाळांतील शिक्षकांना सुट्ट्या कमी मिळणारदिवाळीची सुट्टी शिक्षकांना कधीपासून कधीपर्यंत मिळणार, याबाबतही शाळा व्यवस्थांमध्ये संभ्रम आहे. बºयाच शाळांमध्ये शाळा ७ नोव्हेंबरपासून सुरू केली जात आहे. त्यामुळे शिक्षकांच्या सुट्ट्यांमध्ये निश्चितच कपात होत असून, त्यांच्या सुट्ट्यांवर गदा येत असल्याची प्रतिक्रिया शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी दिली. अनेक खासगी शाळांमध्ये काही सणांना देण्यात येणाºया सुट्ट्यांमध्ये कपात करत असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, याचा थेट परिणाम शिक्षकांच्या सुट्ट्यांवरही होत असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून इतर विभागीय उपसंचालक कार्यालयाप्रमाणे शाळा महाविद्यालये एकाच दिवशी पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :SchoolशाळाDiwaliदिवाळी