शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी परीक्षेचे वेळापत्रक उद्या जाहीर होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 06:11 IST

सीईटीचे वेळापत्रक आणि अर्ज नोंदणी केव्हा सुरू होईल, याचा तपशील सोमवारी राज्य शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : यंदा दहावीच्या परीक्षेत अगदी १०० टक्के गुण मिळवूनही विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश मिळणार नाही. या प्रवेशासाठी त्यांना यंदा सीईटी परीक्षा द्यावी लागणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांना राज्य शिक्षण मंडळाकडून सीईटीचे वेळापत्रक कधी जाहीर होणार, याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, सीईटीचे वेळापत्रक आणि अर्ज नोंदणी केव्हा सुरू होईल, याचा तपशील सोमवारी राज्य शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावर्षी पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लागला आहे. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे लाखो विद्यार्थी राज्यात आहेत तर मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या १५ हजारांवर आहे; मात्र यंदाच्या अकरावी प्रवेशात सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये उत्तम गुण मिळणार आहेत, त्यांना त्यांच्या सीईटीच्या गुणांकनानुसार अकरावी प्रवेशात प्राधान्य देण्यात येईल. त्यामुळे दहावीच्या निकाल पार पडला असला तरी विद्यार्थ्यांना आता सीईटी परीक्षेच्या दिव्यातून पार पडावे लागणार आहे. साहजिकच इथे त्यांना सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांशी नामांकित महाविद्यालयासाठी स्पर्धा करावी लागणार आहे.

दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यान मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचा विचार करता इंग्रजी भाषेचा पर्याय असेल तर मराठीचाही पर्याय विद्यार्थ्यांना असावा, अशी मागणी मराठी शाळा संघटना, मुख्याध्यापक संघटनेने केली आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी असताना त्यांना मराठी विषय वगळता हे चार विषय त्यांच्यावर थोपवले जात असतील तर या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अन्यायकारक व मराठी भाषेला दुय्यम स्थान देणारा असणार आहे. या विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर होण्यासाठी मराठी विषयाला स्थान द्यावे किंवा हवे तर मराठीसह हे विषय ऐच्छिक ठेवा. ज्यांना ज्या विषयातून परीक्षा द्यायची ते विषय विद्यार्थी निवडतील, अशी मागणी मराठी शाळा संस्थाचालक संघाने मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांना लिहिलेल्या निवेदनात केली आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणMumbaiमुंबई