शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मुदतवाढ: सीबीएसई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 05:31 IST

निकाल तयार करण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने या  प्रक्रियेत सहभागी असलेले  शिक्षक तणावाखाली असून धास्तावले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :   केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शाळांसाठी बारावीचा निकाल तयार करण्याची मुदत २५ जुलैपर्यंत वाढविली आहे, असे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी बुधवारी सांगितले. आधी ही मुदत २२ जुलै होती.

निकाल तयार करण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने या  प्रक्रियेत सहभागी असलेले  शिक्षक तणावाखाली असून धास्तावले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून चुका होत आहेत. या चुका दुरुस्त करण्यासाठी शिक्षक सीबीएसईला विनंती करीत आहेत.

 समस्यांची सीबीएसईला जाणीव आहे. त्या पार्श्वभूमीवर सीबीएसईने  अंतिम तारीख वाढवून २५ जुलै करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ जुलै  रोजी निकाल घोषित केला जाणार आहे. तथापि, निकाल तयार करण्यासाठी शाळांना मुदतवाढ देण्यात आल्याने निकाल घोषित करण्यात उशीर होईल का? याबाबत सीबीएसईने स्पष्ट केले नाही.

१६ ऑगस्टपासून खासगी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा

- बाहेरून दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यासाठी १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत परीक्षा आयोजित केल्या जातील, असेही सीबीएसईने सांगितले. 

- नियमित विद्यार्थ्यांसाठीच्या पर्यायी मूल्यांकन धोरणाच्या आधारे खासगी विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करण्याची शक्यता नाकारताना सीबीएसईने स्पष्ट केले की, शाळा आणि सीबीएसईकडे या विद्यार्थ्यांच्या मागच्या  मूल्यांकनाची कोणतीही नोंद नाही.  

- उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून खासगी विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकालही लवकरच घोषित केला जाईल, असेही परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले. 

टॅग्स :Educationशिक्षण