शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

CBSE 12th Exam News: मोठी बातमी! सीबीएसईची १२ वीची परीक्षा रद्द; मोदी सरकारचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 19:38 IST

CBSE 12th class Exam cancelled: पंतप्रधानांनी आज सायंकाळी राज्ये आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये परीक्षा न घेतल्यास काय पर्याय आहेत, यावर चर्चा करण्यात आली. 

cbse class 12th exam: कोरोनामुळे यंदाची सीबीएसईची (CBSE) 12 वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Government of India has decided to cancel the Class XII CBSE Board Exams. )

पंतप्रधानांनी आज सायंकाळी राज्ये आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये परीक्षा न घेतल्यास काय पर्याय आहेत, यावर चर्चा करण्यात आली. केंद्रीय शिक्षणमंत्री १ जून रोजी परीक्षांच्या तारखांची घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात होतं. 

या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राजनाथ सिंह उपस्थित होते. शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक हे कोरोना पश्चातच्या आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मागच्या बैठकीत सीबीएसईची १0 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १२ वीची परीक्षा रद्द केल्याचे आता सर्वोच्च न्यायालयाला 3 जूनला कळविण्यात येणार आहे. (cbse class 12th exam cancelled by PM Narendra Modi.)

परीक्षा रद्द करण्यासाठी विरोधकांनी आवाज उठविला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज देखील परीक्ष रद्द करण्याची मागणी केली होती. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीदेखील काल पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी परीक्षा रद्द करून शाळांद्वारे अंतर्गत गुण देण्याचा पर्याय ठेवला होता. 

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी