CBSE 12th Exam News: मोठी बातमी! सीबीएसईची १२ वीची परीक्षा रद्द; मोदी सरकारचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 07:37 PM2021-06-01T19:37:37+5:302021-06-01T19:38:12+5:30

CBSE 12th class Exam cancelled: पंतप्रधानांनी आज सायंकाळी राज्ये आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये परीक्षा न घेतल्यास काय पर्याय आहेत, यावर चर्चा करण्यात आली. 

CBSE Board Class 12 examinations cancelled; PM Narendra Modi decide in meeting | CBSE 12th Exam News: मोठी बातमी! सीबीएसईची १२ वीची परीक्षा रद्द; मोदी सरकारचा निर्णय 

CBSE 12th Exam News: मोठी बातमी! सीबीएसईची १२ वीची परीक्षा रद्द; मोदी सरकारचा निर्णय 

Next

cbse class 12th exam: कोरोनामुळे यंदाची सीबीएसईची (CBSE) 12 वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Government of India has decided to cancel the Class XII CBSE Board Exams. )


पंतप्रधानांनी आज सायंकाळी राज्ये आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये परीक्षा न घेतल्यास काय पर्याय आहेत, यावर चर्चा करण्यात आली. केंद्रीय शिक्षणमंत्री १ जून रोजी परीक्षांच्या तारखांची घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात होतं. 


या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राजनाथ सिंह उपस्थित होते. शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक हे कोरोना पश्चातच्या आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. 
मागच्या बैठकीत सीबीएसईची १0 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १२ वीची परीक्षा रद्द केल्याचे आता सर्वोच्च न्यायालयाला 3 जूनला कळविण्यात येणार आहे. (cbse class 12th exam cancelled by PM Narendra Modi.)

परीक्षा रद्द करण्यासाठी विरोधकांनी आवाज उठविला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज देखील परीक्ष रद्द करण्याची मागणी केली होती. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीदेखील काल पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी परीक्षा रद्द करून शाळांद्वारे अंतर्गत गुण देण्याचा पर्याय ठेवला होता. 

Web Title: CBSE Board Class 12 examinations cancelled; PM Narendra Modi decide in meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.