शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

एकच विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा; शिक्षकही एकच, वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत रोज देतात धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 06:27 IST

वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर धानाेरा या गावातील जिल्हा परिषद शाळेत एकच विद्यार्थी  शिक्षण  घेत असून, एकच शिक्षक त्याला शिक्षणाचे धडे देतात.

प्रफुल बानगावकर कारंजा (जि. वाशिम) :

वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर धानाेरा या गावातील जिल्हा परिषद शाळेत एकच विद्यार्थी  शिक्षण  घेत असून, एकच शिक्षक त्याला शिक्षणाचे धडे देतात. कार्तिक बंडू शेगोकार असे  विद्यार्थ्याचे नाव असून तो इयत्ता तिसरीत आहे. एक पटसंख्या असणारी ही बहुदा राज्यातील एकमेव शाळा असावी. या शाळेत वर्ग १ ते ५ असून, ४ वर्गखोल्या आहेत. पण विद्यार्थी एकच आणि शिक्षकही एकच आहे. तरीही ही शाळा सुरू असल्याने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 

गावात चार विद्यार्थी, त्यातील तीन बाहेर...- गावात अवघी ३२ घरे असून, लोकसंख्या १५० एवढी आहे. गावात शिक्षण घेणारे एकूण चार विद्यार्थी आहेत. त्यापैकी तीन विद्यार्थी कांरजा येथे शिक्षण घेत आहेत. कार्तिक हा चौथा विद्यार्थी. - यासंदर्भात शिक्षक किशोर मानकर म्हणाले, गावात विद्यार्थीच नाहीत.  एक विद्यार्थी आहे. त्यालाच शिक्षणाचे धडे देत आहे. - या विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने ताे गावातीलच शाळेत शिक्षण घेत आहे.

त्या ठिकाणी आतापर्यंत दोन शिक्षक कार्यरत होते. मात्र पटसंख्या कमी झाली. त्यामुळे तालुकास्तरावर एका शिक्षकाची बदली करण्यात आली. आता एक विद्यार्थी एक शिक्षक कार्यरत आहे. नियमाप्रमाणे शाळा बंद करता येत नाही किवा विद्यार्थ्यांना स्थलांतरित करता येत नाही.- श्रीकांत माने, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, कारंजा

टॅग्स :Educationशिक्षण