शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेचा पहिला दिवस घरातूनच, ऑनलाइन शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 05:49 IST

लॉकडाऊनमुळे मागील वर्षीही विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाचा प्रत्यक्ष आनंद घेता आला नव्हता आणि यंदाही शिक्षक आणि वर्गशिक्षकांची तोंडओळख ऑनलाइनच करून घ्यावी लागेल.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी विद्यार्थी सुरक्षिताता लक्षात घेऊन तूर्तास नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाइन करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे उद्यापासून (मंगळवार, १५ जून) राज्यातील बरेच विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुटीनंतर पुन्हा एकदा अभ्यासाला लागतील, मात्र ऑनलाइन पद्धतीनेच.

लॉकडाऊनमुळे मागील वर्षीही विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाचा प्रत्यक्ष आनंद घेता आला नव्हता आणि यंदाही शिक्षक आणि वर्गशिक्षकांची तोंडओळख ऑनलाइनच करून घ्यावी लागेल. दरम्यान, याही परिस्थितीत नवीन वर्ग मित्र, नवीन शिक्षक यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह कायम आहे. दरम्यान, विदर्भातील शाळांचे शैक्षणिक वर्ष २८ जूनपासून सुरू हाेईल.

शाळा सुरू झाल्यावर शिक्षकांना मात्र शाळांतील उपस्थिती बंधनकारक आहे. इयत्ता १० वी व १२ वीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरू असून, मर्यादित वेळेत यंदा निकाल जाहीर करायचे असल्याने राज्यातील विदर्भासह इयत्ता दहावी, बारावीला शिकवणाऱ्या शिक्षकांची शाळांमध्ये १०० टक्के उपस्थिती गरजेची असल्याच्या सूचना शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत. तसेच इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती शाळांमध्ये बंधनकारक असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. साेबतच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसोबत प्राथमिक, माध्यमिक मुख्याध्यापक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांचीही उपस्थिती अनिवार्य आहे.

शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार नवीन वर्षाची सुरुवात यंदा नवीन अभ्यासक्रमाने न होता उजळणीने होईल. मात्र, ती उजळणी कशी व कोणत्या घटकांची असावी, कोणत्या विद्यार्थ्यांची असावी, याबाबत शिक्षण विभागाकडून शाळा, मुख्याध्यापक, शिक्षकांना काहीच सूचना अद्याप आलेल्या नाहीत. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वर्षासंदर्भात काहीच आराखडा विद्यार्थ्यांसमोर सादर करता येणार नाही, अशी खंत मुख्याध्यापक व्यक्त करत आहेत.

प्रवाहाबाहेरील विद्यार्थीज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षण घेण्याची सोय नाही, ते विद्यार्थी गेल्या वर्षापासूनच ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले आहेत. या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, याबद्दल शिक्षण विभागाने काहीच कार्यवाही केली नसल्याची नाराजी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

टॅग्स :Schoolशाळा