शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशाच्या ४० टक्के जागा रिक्त; प्रवेशाचा आज शेवटचा दिवस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 09:12 IST

आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांना चांगल्या शाळांमध्ये मोफत शिक्षण घेता यावे यासाठी राखीव जागांवर आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू झाली.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशांना दिलेल्या दुसऱ्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे. अद्यापही राज्यात प्रवेशासाठी निवड झालेल्या ३० हजार विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती बाकी आहे. रिक्त जागांपैकी मुंबईतीलही ४० टक्के जागावर प्रवेशनिश्चिती होणे बाकी आहे.

 एकीकडे मोठ्या शाळांमधील आरटीई प्रवेश सहज होत असताना दुसरीकडे इतर शाळांमध्ये प्रवेशनिश्चिती करण्यासाठी पालक फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश संथगतीने होत असल्याचे मत आरटीई अधिकारी व्यक्त करीत आहेत. या प्रवेशांना मुदतवाढ दिल्याने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थीही प्रवेशासाठी ताटकळत असल्याचे चित्र पहायला  मिळत आहे. 

आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांना चांगल्या शाळांमध्ये मोफत शिक्षण घेता यावे यासाठी राखीव जागांवर आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. यंदा प्रवेशासाठी अर्ज ही मोठ्या प्रमाणावर आले,  तर प्रवेशनिश्चितीकडे पालक पाठ फिरवीत आहेत. दुसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही राज्यात ३० हजार जागावर प्रवेश झाले नाहीत. पालकांना हव्या त्या शाळांत प्रवेश मिळत नसल्याने व बनावट अर्ज, प्रमाणपत्रे सादर केल्याची प्रकरणे समोर आल्याने जागा रिक्त राहत असल्याची माहिती समन्वयक देत आहेत. 

आता मुदतवाढ नको  प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना संधी द्या पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देऊन प्रवेशाची संधी देण्यात आली.  प्रवेशप्रक्रिया वेळेवर संपवायची असेल तर आता तिसऱ्यांदा मुदतवाढ न देता प्रतीक्षायादीतील विद्यार्थ्यांना संधी द्या अशी मागणी काही पालकांकडून होत आहे.

खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये२५% राखीव जागांसाठी काढलेल्या सोडत जाहीर झाली असून, राज्यभरातील ९ हजार ८६ शाळांत असलेल्या १ लाख १ हजार  ९०९ जागांपैकी पहिल्या सोडतीत ९० हजार ६८८  विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यातील ६० हजार ९८५ जागांवर अद्याप प्रवेशनिश्चिती झाली आहे.  

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा