शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वाढता कर्जबाजारीपणा! गरीब कुटुंबे कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडू शकतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 07:09 IST

भारतीय कष्टकरी महिलांच्या ‘डीएनए’मध्येच पैशाच्या नियोजनाचे शहाणपण असते. कुटुंबाच्या हितासाठी ते त्यांनी पुन्हा वापरण्याची तातडीची गरज आहे.

संजीव चांदोरकरआर्थिक विषयांचे अभ्यासक

आपल्या देशातील गरीब/ निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांचा वाढता कर्जबाजारीपणा रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीतून पुढे येत आहे. या समाज  घटकांना दिलेली कर्जे थकीत होण्यामुळे, देशाच्या ‘मॅक्रो’ (स्थूल) अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतोच. त्याहीपेक्षा गंभीर आहे या कुटुंबाच्या ‘मायक्रो’ अर्थव्यवस्थेवर होणारे विपरीत परिणाम.  

आहार/ आरोग्य/ मुलांचे शिक्षण यांसारख्या अत्यावश्यक खर्चात कपात करावी लागणे, सततच्या चिंतेमुळे निद्रानाश/  आरोग्यावर परिणाम, कौटुंबिक ताणतणाव वाढणे.. अशी त्यांच्या प्रश्नांची मोठी यादी करता येईल. कोट्यवधी गरीब निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांचा वाढता कर्जबाजारीपणा हा फक्त वित्तीय प्रश्न कधीच नव्हता. त्याला अनेक गंभीर आयाम आहेत. त्यांच्या कर्जबाजारीपणाची मुळे अर्थातच त्यांची मासिक आमदनी पुरेशी न वाढण्यात आणि शासनाने घरबांधणी, शिक्षण, आरोग्य क्षेत्रातून अंग काढण्यात आहेत. शेतीक्षेत्रातील अरिष्ट, बेरोजगारी, तुटपुंजे वेतन, धंदा/ व्यवसाय धड नीट न चालणे.. अशा अनेक घडामोडींमध्ये आहेत. सद्य:कालीन राजकीय आर्थिक संरचनेत किमान काही जनकेंद्री बदल झाले तरच त्यांच्या प्रश्नांची धार बोथट होऊ शकेल. त्यासाठी राजकीय जन-आंदोलनांमध्ये या बाधित कुटुंबांनी सहभागी व्हायला हवे. कारण तेच त्यांचे प्रत्यक्ष लाभार्थी असणार आहेत; पण हे सर्व बदल होणे नजीकच्या काळात तरी कठीण वाटते.

या प्रश्नाची धार बोथट करण्यासाठी या समाज अर्थ घटकांमधील कुटुंबांना, स्वतःला काहीच करता येणार नाही का? - याचे उत्तर शोधण्यासाठी ‘कर्ज कशासाठी काढले जाते आणि कर्ज कसे फेडले जाते’ या दोन उपप्रश्नांची उत्तरे तपासण्याची गरज आहे. या दोन्ही आघाड्यांवर काही कृती करणे गरीब कुटुंबांच्या नक्कीच हातात आहे. फक्त आपण ज्या कर्ज सापळ्यात अडकलो आहोत त्यातून बाहेर येण्याचा निर्धार हवा, ज्यात कुटुंबातील सर्व प्रौढ सभासदांचा सहभाग हवा आणि या कुटुंबांनी, विशेषतः त्यातील महिलांनी, त्यांच्याकडे आधीच असणाऱ्या पैशाचे नियोजन करण्याच्या परंपरागत शहाणपणाचा वापर करावयास हवा. 

गरिबांना कर्ज काढण्याशिवाय गत्यंतर नसते हे खरे; पण विशिष्ट कर्ज कशासाठी आणि किती काढले हा महत्त्वाचा मुद्दा. कर्जांमध्ये अत्यावश्यक, काही काळानंतर केले तरी चालतील असे,  कमी पैसे खर्च केले तरी चालतील असे किंवा बिलकुल केले नाही तरी चालतील.. असे वर्गीकरण करता येईल. एका टोकाला कुटुंबातील एखाद्या सभासदाला तातडीने इस्पितळात उपचार करण्याची वेळ आहे, जो जीवनमरणाच्या प्रकारात मोडेल; स्मार्टफोन ४०,००० रुपयांच्या ऐवजी २०,००० रुपयांचा घेता येऊ शकतो किंवा घरातील लग्ने कमी खर्चात करता येऊ शकतात. ही झाली काही मोघम उदाहरणे. सर्व कुटुंबांना एकाच प्रकारचे वर्गीकरण लागू देखील होणार नाही. प्रत्येक खर्च करताना कुटुंबातील सभासदांनी एकत्र बसून, कुटुंबाच्या खर्चाचे प्राधान्यक्रम ठरवून सजगपणे निर्णय घेणे महत्त्वाचे. फक्त दारावर येऊन एखाद्या कंपनीचा कोणी एजन्ट कर्ज देऊ करत आहे म्हणून ते घेता कामा नये. 

कुटुंबे कर्जाचे हप्ते कसे फेडतात याचा शोध घेतला की लक्षात येते की कर्ज घेतल्यामुळे पैशाच्या तंगीचे प्रश्न तात्पुरते सुटतात, पण कर्जाचे हप्ते ठरलेल्या दिवशी भरण्यासाठी पैशाची जी जमवाजमव करावी लागते ती त्या कुटुंबाने बाजूला काढलेल्या बचतीमधूनच येते. त्यासाठी त्यांना अनेकवेळा अत्यावश्यक खर्चातदेखील कपात करावी लागते. कर्जाचे हप्ते फेडण्याच्या दडपणाखाली जर कुटुंबाना, कसेही करून पैसे बाजूला काढावे लागत असतील तर तशाच बचती कुटुंबे स्वतःहून करू शकतीलच की. 

अर्थात, हा विचार काही नवीन नाही. फक्त काही वर्षांपूर्वी गरीब/ निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांना कर्ज देण्यास कोणी बँका/ वित्तसंस्था तयार नव्हत्या.  त्या काळात अशा कुटुंबातील महिला आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नाप्रमाणे खर्चाचे प्राधान्यक्रम ठरवीत, कितीही तंगी असली तरी काही पैसे बाजूला काढून ठेवत, जमले तर सोन्याची एखादी तार विकत घेऊन ठेवत. महिलांच्या ‘डीएनए’मध्ये असणाऱ्या पैशाच्या नियोजनाचे हे शहाणपण त्यांनी पुन्हा एकदा वापरण्याची तातडीची गरज तयार झाली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rising Debt: Can Poor Families Escape the Debt Trap?

Web Summary : Rising debt among poor families impacts their finances and the economy. Families must prioritize spending, avoid unnecessary loans, and revive traditional savings habits. Collective action and policy changes are vital for long-term relief.