शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नव्या ‘थेअरी’ने तरी प्रद्युम्नला न्याय मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:45 IST

निष्पाप बालमन एवढे विकृत होतेच कसे? ही सूड भावना त्यांच्यात कुठून येते, हा गंभीर प्रश्न आहे आणि शासनासोबतच कुटुंब आणि समाजानेही यावर सखोल चिंतन करण्याची गरज आहे.

निष्पाप बालमन एवढे विकृत होतेच कसे? ही सूड भावना त्यांच्यात कुठून येते, हा गंभीर प्रश्न आहे आणि शासनासोबतच कुटुंब आणि समाजानेही यावर सखोल चिंतन करण्याची गरज आहे. मुले गुन्हेगारीकडे वळण्याची अनेक कारणे आहेत. घरातील आर्थिक, भावनिक परिस्थिती, मित्रांची साथसंगत ही सुद्धा वाढत्या बालगुन्हेगारीस कारणीभूत आहे.गुडगावच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न ठाकूर या सहा वर्षीय मुलाच्या निर्घृण हत्या प्रकरणाला मिळालेले नवे वळण अत्यंत धक्कादायक, डोके चक्रावून टाकणारे आणि तेवढेच अविश्वसनीय आहे. याच शाळेत अकरावीत शिकणाºया एका विद्यार्थ्याने शाळेची परीक्षा आणि पालक सभा पुढे ढकलली जावी, या अतिशय क्षुल्लक कारणावरून प्रद्युम्नची हत्या केल्याचा सीबीआयचा दावा आहे. तपास संस्थेने या विद्यार्थ्याला अटक केली असून, त्याने आपला गुन्हा कबूल केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे संशयित मुलाच्या पालकांनी मात्र आपल्या पाल्यास विनाकारण या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी गुडगाव पोलिसांनी स्कूल बसच्या कंडक्टरला अटक केली होती आणि हत्येपूर्वी मृत बालकावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला असल्याचा संशयही व्यक्त केला होता. सीबीआयच्या या नव्या थेअरीमुळे दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडाच्या चौकशीत गुडगाव पोलीस आणि सीबीआय आमनेसामने उभे ठाकले आहेत. या प्रकरणात अकरावीच्या विद्यार्थ्याचे आलेले नाव आश्चर्यचकित करणारे आणि बालमनाची बदलत चाललेली मानसिकता दर्शविणारे आहे. अमेरिकेसारख्या देशात जेथे बंदुकीसारखे शस्त्र अगदी सहजपणे उपलब्ध असते; शाळकरी विद्यार्थ्यांनी शाळेत अंदाधुंद गोळीबार केल्याच्या घटना घडत असतात. भारतात मात्र अशाप्रकारच्या विकृतीपासून मुले सुरक्षित असल्याचे आजवर मानले जात होते. परंतु प्रद्युम्न हत्याकांडातील या नव्या खुलाशाने या विश्वासाला तडा गेला आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम, इंटरनेटसारख्या सुविधा यामुळे मुलांना बालवयातच नको त्या गोष्टी कळू लागल्या आहेत. काय चांगले आणि काय वाईट हे समजण्याची परिपक्वता नसल्याने बरेचदा मग ते वाईट मार्गाकडे वळत असल्याचे अलीकडच्या काळात प्रकर्षाने जाणवत आहे. त्यांच्यातील गुन्हेगारीची मानसिकता वाढते आहे. देशातील बालगुन्हेगारीच्या वाढत्या आलेखावरून त्याची प्रचिती यावी. देशात दरवर्षी बालगुन्हेगारीची सरासरी ३५ हजार प्रकरणे उघडकीस येत असतात. एरवी बालगुन्हेगारी म्हटले की आपल्यासमोर अनाथ, बेकार, रस्त्यावर वाढणारी अथवा घरातून पळून जाणारी मुलेच नजरेसमोर येतात. परंतु बालगुन्हेगारीचे हे विश्व आता केवळ गरिबांपुरतेच सीमित राहिलेले नाही. चोरी, पाकीटमारी, हाणामारी हे किरकोळ गुन्हे झाले. आता तर खून, दरोडे, बलात्कार, विनयभंग अशा गंभीर गुन्ह्यांमधेही त्यांचा समावेश वाढला आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. या वास्तवाने मुलांवरील संस्कार, त्यांची जडणघडण, शिक्षणातील त्रुटी तसेच व्यवस्थेतील अकार्यक्षमतेसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रद्युम्न प्रकरणात सीबीआयची थेअरी चुकीची निघावी, असे मनोमन सर्वांनाच वाटत असेल. पण हेच सत्य असल्यास ते स्वीकारून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासन आणि समाजाने एकजुटीने प्रयत्न करावे लागतील.

टॅग्स :Ryan International Schoolरेयान इंटरनॅशनल स्कूलStudentविद्यार्थी