शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

कृत्रिम बुद्धिमत्ता कलाकारांच्या जिवावर उठेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 08:00 IST

कृत्रिम बुद्धिमत्ता नवनिर्मिती करू शकत नाही, दिलेल्या आदेशांनुसार अगोदर उपलब्ध असलेल्या कलाकृतींची सरमिसळ तेवढी करू शकते!

-विनील भुर्के, कलेचे अभ्यासक, विद्यार्थी२०२३ च्या सुरुवातीलाच  Accenture या जगविख्यात कंपनीच्या तंत्रज्ञान विभागाचे ऑस्ट्रियाचे राष्ट्रीय प्रमुख Helmut Schindlwick यांनी एक सनसनाटी घोषणा केली - “मी नुकतीच ‘Luna The Astronaut Girl’ नावाची विज्ञानकथा पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. यात कथेचा विषय ठरवण्यापासून त्यातील कथानक साकारणे, त्याला साजेशी व्यक्तिमत्त्वे घडवणे, इतकेच नव्हे तर त्यांची चित्रे काढणे हे सर्व कृत्रिम बुद्धिमत्तेची (यापुढे AI - आर्टिफिशियल इंटेलिजन्स) विविध साधने वापरून केले आहे. हे करायला मला केवळ ११ तास लागले. एका वीकएंडला मी सहज गंमत म्हणून हे करून पहिले आणि आता ते पुस्तक  विक्रीसाठी उपलब्ध आहे.” - हे त्यांचे विधान जगभरात खळबळ माजवणारे ठरले.  

या विधानात  संगणकप्रणाली आणि AI चा वापर करून आपण काहीही करू शकतो, हा संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचा आत्मविश्वास तर आहेच; पण पुस्तक लिहिण्याच्या एरवी अत्यंत गुंतागुंतीच्या  कृतीला  हलक्यात घेणेदेखील आहे. या विज्ञानकथेत अंतराळ सफरीला जाणाऱ्या लहान मुलीचे लुना नावाचे मुख्य पात्र आणि इतर पात्रांची कल्पनाचित्रे अगोदर अस्तित्वात असलेल्या इतर कुठल्याही चित्रांशी जुळत नाहीत, त्यामुळे ही चित्रे एक स्वतंत्र निर्मिती आहेत, असेही हे महाशय म्हणाले. थोडे  खोलात गेल्यावर  माझ्या  लक्षात आले की या पुस्तकातली लहान मुलीची छबी आणि Disney Pixar या जगप्रसिद्ध अमेरिकन ॲनिमेशन चित्रपटनिर्मिती कंपनीने २०१२ साली प्रदर्शित केलेल्या Brave या ॲनिमेशनपटातील मेरिंडा नावाच्या मुलीची छबी यांच्यात साम्य आहे. मेरिंडा चितारण्यासाठी Pixar ने स्वत:चे नवे सॉफ्टवेअर करण्याच्या व्यापात तब्बल तीन वर्षे खर्ची घातली होती म्हणे! इथे तर ११ तासांमध्ये संपूर्ण पुस्तक तयार झाले आहे! म्हणजे हा तर आयत्या बिळावर नागोबा!- मूलभूत प्रश्न असा, की या कलाकृतीचा निर्माता कोण? AI साधने वापरून ती तयार करणारा कलाकार? ती  साधने ज्यांनी विकसित केली ते तंत्रज्ञ-शास्त्रज्ञ, की त्या AI ला प्रशिक्षण देताना ज्या कलाकारांची मूळ कलाकृती उदाहरण म्हणून वापरली ते? मुळात इतर कोणीतरी निर्माण केलेला माहितीचा प्रचंड मोठा साठा AI प्रणालीला प्रशिक्षण देण्यासाठी वापरताना त्या माहितीच्या मूळ निर्मात्यांची परवानगी घेतली जाते का, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या AI प्रणालींना प्रशिक्षण देताना गेल्या दोनेकशे वर्षांमध्ये लिहिले गेलेले सर्व प्रमुख साहित्य आणि  सर्व महत्त्वाच्या कलाकारांची चित्रे इतका प्रचंड साठा पुरवला गेलेला आहे. गेल्या १५-२० वर्षांमध्ये  आंतरजालावर आणि नंतर विविध समाजमाध्यमांच्या मार्फत निर्माण झालेला माहितीचा प्रचंड साठाही कोणीतरी विनामोबदला वापरत आहे. 

जर्मनीमधील कला-इतिहास संशोधन संस्थेत काम करणाऱ्या प्राध्यापिका Dr. Eva Wattolik यांना मी अलीकडेच विचारले, “AI कलेच्या आणि पर्यायाने कलाकारांच्या जिवावर उठणार का?” त्या म्हणाल्या, “२००१ सालादरम्यान युरोपात ‘व्हिडीओ आर्ट’ नावाचा कलाप्रकार दिसू लागला. त्यावेळी चित्रकार, कलाकार खूप अस्वस्थ झाले, हाताने चित्रे   काढण्याची कला संपुष्टात येणार की काय, असे त्यांना वाटत होते; परंतु, व्हिडीओ किंवा इतर संगणकीय साधने वापरून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की यामधून जे दाखवता येते ते आणि हाताने चित्रे काढून जे दाखवता येते  ते, या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अभिव्यक्ती असतात. आता युरोपातील कलाकार नवीन तंत्रज्ञानाकडे संशयी दृष्टीने बघत नाहीत.  AI मुळे आपली हाताने केलेली चित्रकला धोक्यात येत आहे, असे वाटत नाही.” तरीही समाजमाध्यमांवरीलमाहितीचा साठा असा ओरबाडून परस्पर वापरणे कायदेशीर आहे का? बहुधा नाही!  गेट्टी इमेजेस या आंतरजालावर अधिकृतरीत्या छायाचित्रे विकणाऱ्या कंपनीने StabilityAI या कंपनीवर आपल्या संग्रहातील असंख्य छायाचित्रांची अनधिकृत नक्कल  Stable Diffusion या AI साधनाला प्रशिक्षण देण्यासाठी वापरल्याचा आरोप करत, कॉपीराइट कायद्याचा भंग केल्याचा खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गेट्टी इमेजेसचे म्हणणे, AI साधनांना नव्हे, कॉपीराइट असलेली छायाचित्रे विनामोबदला अनधिकृतरीत्या वापरण्याला आमचा विरोध आहे! या प्रकरणात कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन झालेले नाही, असे प्रतिवादींचे म्हणणे आहे. साहजिकच, या खटल्याचा निकाल ऐतिहासिक ठरणार हे नक्की. 

AI हा कलेचा आणि कलाकारांचा कर्दनकाळ ठरणार की नाही, हे नजीकच्या भविष्यात मनुष्यरूपी कलाकार म्हणून आपण सगळे किती सकस, स्वतंत्र आणि नवसर्जक काम करू शकतो, यावरच अवलंबून असेल. कारण AI खऱ्या अर्थाने कलेची नवनिर्मिती करू शकत नाही, दिलेल्या आदेशांनुसार अगोदर उपलब्ध असलेल्या कलाकृतींची सरमिसळ करू शकते. मानवी सर्जनशीलतेची जपणूक करायची असेल तर इथून पुढे आपली प्रत्येक नवनिर्मिती आपल्याला सुरक्षित ठेवावी लागेल. कलाकार, कला-विद्यार्थी, कला-रसिक म्हणून आपण सर्वांना डोळसपणे हे सगळे समजून घ्यावे लागेल!vineelvb@gmail.com(‘चिन्ह’ या संकेतस्थळाच्या सौजन्याने)

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स