शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

पाकिस्तानला पुराने का उद्ध्वस्त केले? तेथील एक तृतीयांश जमीन सध्या पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 11:15 IST

पाकिस्तानातील एक तृतीयांश जमीन सध्या पाण्याखाली आहे, देशात आणीबाणी लावण्याइतका भीषण पूर येण्याची कारणे काय आहेत?

प्रवीण कोल्हे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, पुणे -या शतकातील सर्वात मोठा पूर सध्या पाकिस्तान अनुभवत आहे. या देशातील सुमारे एक तृतीयांश जमीन सध्या पाण्याखाली आहे. साडेतीन कोटी लोक विस्थापित झाले आहेत, तर तेराशेपेक्षा जास्त लोक प्राणास मुकले आहेत. १२ लाख घरे, ५००० किलोमीटर लांबीचे रस्ते आणि २४० पूल आतापर्यंत वाहून गेले आहेत. एवढे घडूनसुद्धा दुर्दैवाचा फेरा अजून संपलेला नाही, असे म्हटले जात आहे. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये पूर, जलमय परिस्थिती, संसर्गजन्य रोग आणि मदतकार्यात येणाऱ्या बाधा ही आव्हाने असणार आहेत. २५ ऑगस्ट २०२२ रोजी पाकिस्तानने आणीबाणी घोषित केली आहे. ‘नेचर’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार २०२२ चा पूर येण्यामागे प्रमुख दोन कारणे आहेत. पहिले कारण हे हवामानातील बदलाशी निगडित आहे. या वर्षांच्या एप्रिल - मे महिन्यात उष्णतेची लाट आली. त्यामुळे उत्तरेकडील बर्फाच्छादित असलेल्या पर्वतरांगा वितळून हिमनद्यांमध्ये पूर आला. दुसरे कारण मुसळधार मोसमी पावसाशी निगडित आहे. एप्रिल-मे २०२२ मध्ये पाकिस्तानात उष्णतेची तीव्र लाट आली होती. जकोबाबाद शहरात तापमानाचा पारा ५२.८ अंश सेल्सियसपर्यंत वाढला होता. जगातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण म्हणून या शहराची नोंद झाली होती. जर वातावरणात उष्मा असेल तर हवा जास्त आर्द्रता धरून ठेवते. या पार्श्वभूमीवर जोरदार पर्जन्यमान होणार, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली होती. या उष्णतेच्या लाटेमुळे पाकिस्तानच्या उत्तरेकडील हिमशिखरे आणि हिमनद्या वितळून त्यातील पाणी सिंधू (इंडस) नदीमध्ये जमा होऊ लागले होते. सिंधू नदी पाकिस्तानमधील सर्वात मोठी नदी असून या नदीने पाकिस्तानचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग केले आहेत. ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत कराचीजवळ अरबी समुद्रास मिळते. सिंधू नदी व या नदीस मिळणाऱ्या उपनद्यांवर पाकिस्तानमधील सुमारे दोन तृतीयांश शेती आणि पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अवलंबून आहेत. पाकिस्तानच्या उत्तरेकडील हिमनद्यांमधून सिंधू नदीमध्ये आलेले पाणी हे अत्यंत गढूळ आणि गाळयुक्त होते. यावरून असा निष्कर्ष काढला गेला की, हिम वितळण्याची प्रक्रिया अत्यंत जलद गतीने घडली असणार आणि त्यामुळे या पाण्यासोबत गाळ वाहून आला. प्रवाहात असलेल्या बर्फ, माती, दगड यामुळे नदीच्या पात्रात अडथळा निर्माण होऊन निसर्गनिर्मित धरण तयार झाले. तथापि, वरच्या बाजूने येणाऱ्या वेगवान प्रवाहामुळे असा जलाशय फुटून हिमनदीचा उद्रेक होऊन पूर येतो. ज्याला हिमतलाव उद्रेक पूर (Glacial lake outburst flood) असे म्हटले जाते. या पुराचा प्रवाह अत्यंत वेगवान असतोच, शिवाय प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आल्याने त्या संवेगामुळे (momentum) त्याची विध्वंसक शक्ती वाढते. अनेक पूल, रस्ते आणि नदीकडील इमारती या पुरामुळे बाधित होऊन पुरासोबत वाहून जातात आणि पुराची ताकद वाढवतात. या वर्षीच्या पुरासाठी कारणीभूत ठरलेले दुसरे कारण अस्मानी संकटाशी निगडित आहे. एप्रिल-मे मध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेनंतर जून महिन्यात अरबी समुद्रात अभूतपूर्व असा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. ही एक दुर्मीळ आणि अपवादात्मक घटना होती. जमिनीवर उष्णतेची लाट आणि समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे या दोन घटना पाठोपाठ घडल्या. यामुळे पाकिस्तानच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडला. यासोबतच मान्सूनचे आगमनदेखील झाले. यामुळे या देशात गेल्या ३० वर्षांच्या सरासरी पर्जन्यमानाच्या दुप्पट पाऊस पडला, ज्याचे एकूण परिमाण ३९०.७ मिलीमीटर एवढे आहे. सिंध आणि बलुचिस्तान या प्रदेशात तर सरासरीच्या पाचपट एवढा पाऊस पडल्याची नोंद झाली. सिंध प्रांतात पाडीदान (Padidan) या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात १,२८८ मीमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. याच ठिकाणी सरासरी ४६ मीमी एवढेच पावसाचे प्रमाण आजवर नोंदवलेले आहे.सिंधू नदीत हिमनद्यांमधून आलेला पूर या नदीच्या आणि उपनद्यांच्या किनाऱ्यावर पसरणे आणि त्याचवेळी इतर भागात मुसळधार पावसामुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळे ते पाणी सखल भागात साचणे यामुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर पुराच्या पाण्याने वेढा घातला.गेल्या २० वर्षात पडलेला पाऊस आणि त्यामुळे आलेला पूर यांचा आढावा घेतला तर लक्षात येते की ढगफुटी, मुसळधार पाऊस आणि जास्त वेळ चालणारा पाऊस यांचे प्रमाण आणि त्यामुळे येणाऱ्या पुराचे प्रमाण वाढतच चालले आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर या परिणामामुळे जगभरातच विध्वंसकारी घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. विकासाच्या वाटेवर असताना पूर आणि दुष्काळ ही संकटे अधिक गांभीर्याने हाताळण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी हवामान बदलांचा स्थानिक स्तरावर होऊ घातलेला परिणाम विचारात घेऊन यथायोग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानfloodपूरRainपाऊस