शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
4
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
5
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
6
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
8
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
9
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
10
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
11
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
12
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
13
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
14
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
15
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
16
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
17
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
18
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
19
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
20
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणाविरोधात एकही मेणबत्ती का पेटत नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 04:39 IST

कुपोषण समस्या कमी न होण्यामागे आपली व्यवस्था कारणीभूत असली, तरी सगळा दोष तिच्या माथी मारणेही योग्य नाही.

- प्रमोद गायकवाडकुपोषण समस्या कमी न होण्यामागे आपली व्यवस्था कारणीभूत असली, तरी सगळा दोष तिच्या माथी मारणेही योग्य नाही. गावोगावच्या भव्य क्रिकेट टुर्नामेंट्स आणि पदयात्रांच्या धुरळ्यात तरु णाई अखंड बुडालेली असताना, त्याच गावांमधील लाखो कळ्या पोषणाअभावी रोज खुरटत आहेत. ऊठसूठ दुखावणाऱ्या अस्मितांच्या बजबजपुरीत पाचशे मुले मेल्यावरही आपल्या संवेदना जाग्या होत नाहीत, हे कशाचे लक्षण आहे?मेळघाटात नऊ महिन्यांत पाचशे बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची बातमी वाचली. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे लोटली, तरी आपण गरीब आदिवासी ग्रामीण जनतेला जगण्यासाठी मूलभूत सुविधा देऊ शकलो नाही, हे खूपच निराशाजनक आहे.कुपोषण आणि बालमृत्यूसारख्या संवेदनशील विषयाच्या अपयशात काही दोष निर्णय प्रक्रि येत सहभागी असलेल्या शासकीय यंत्रणेचा, काही दोष हा अंमलबजावणी करणाºया प्रशासकीय यंत्रणेचा आणि काही दोष अशिक्षित पालकांचा आहे. या तीनही कड्या जोवर सांधल्या जात नाहीत, तोवर कोणीही कितीही वर्षे कितीही अब्ज रुपये खर्च केले, तरी कुपोषणाचे प्रमाण कमी होणार नाही, याची जाणीव झाली. म्हणूनच तुटलेल्या या कड्या जोडून एक नवी साखळी गुंफण्याचा एक प्रयत्न नाशिक जिल्ह्यात केला गेला. दोन वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातही ५६ बालके कुपोषणामुळे दगावली होती. या घटनेने व्यथित होऊन सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थेने बालरोगतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, औषध विक्रेते आणि डॉक्टर्स असोसिएशन यांच्या मदतीने कुपोषण निर्मूलनासाठी एक अभिनव प्रायोगिक उपक्र म राबविला. सुनियोजित पद्धतीने काम केल्यास कुपोषणावर मात करणे शक्य आहे का, हे बघण्यासाठी आदिवासीबहुल त्र्यंबकेश्वर तालुक्यात हा प्रयोग केला.विशेष बाब म्हणजे, या प्रयोगांतर्गत ३५३ कुपोषित मूलांपैकी किमान दोन तपासणी शिबिरांत हजर राहिलेल्या ६५ टक्के मुलांचे वजन केवळ ३ महिन्यांत १ किलोपेक्षा जास्त वाढले. त्यापैकी मृत्यूच्या दारात असलेल्या तीन बालकांना शहरात उपचारासाठी दाखल करून त्यांचा जीव वाचविण्यात आला.कुपोषण निर्मूलनासाठीचे बहुतांश प्रयत्न हे आहार पुरविण्यापर्यंत मर्यादित आहेत. आहारासोबतच निदान आणि उपचार यावरही भर देणे गरजेचे आहे. बालकांमधील कुपोषणाचे कारण तज्ज्ञ डॉक्टर्सकडून व्यक्तिगत स्तरावर निदान करून घेतले जात नाही, तोपर्यंत त्यावर उपचार होणे कठीण आहे. आदिवासी भागातील शिक्षणाच्या कमी प्रमाणामुळे बरेचदा अस्वच्छता, अनियमित आहार आणि औषधांचा अयोग्य वापर हीसुद्धा कुपोषणाची कारणे आहेत.कुपोषणावर काम करणाºया अनेक कार्यकर्त्यांना विचाराल, तर ते शासकीय यंत्रणेकडे बोट दाखवतील. हा सुस्तावलेला अजगर जागा करणे अवघड काम आहे. एखाद्या चित्रपटातील कुठले तरी एक दृश्य आपल्याला चुकीचे वाटते, म्हणून ढिगाने तोडफोड करणारा जमाव, कथा-कवितांमधील मजकूर कुणाला तरी आक्षेपार्ह वाटला, म्हणून पुस्तकांची होळी करणारा आपला समाज हजारो गरीब बालक रोज मृत्युमुखी पडत असताना मात्र निद्रिस्त असतो. खेड्यांपाड्यांतील गोरगरिबांची हजारो मुले रोज अन्नपाण्यावाचून मरून जात असताना, शहरातील अन्यायावर निघणाºया मोर्चातील एकही मेणबत्ती त्यांच्यासाठी पेटत नाही, हे दुर्दैव आहे.( अध्यक्ष, सोशल नेटवर्किंग फोरम)